Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात लवकरच या शहरात पिंक रिक्षा योजना सुरु होणार-अदिती तटकरे

मुंबई प्रतिनिधी - महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी राज्य सरकार नवी योजना आणणार आहे. त्याअंत

पोलीस निवासस्थानांच्या दुरावस्थेचा प्रश्न आ. नमिता मुंदडांनी मांडला विधीमंडळात
कराडच्या शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाला 10 कोटीचा निधी देणार : ना. उदय सामंत
भ्रष्टाचाराचे धार्मिक संदर्भ

मुंबई प्रतिनिधी – महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी राज्य सरकार नवी योजना आणणार आहे. त्याअंतर्गत महत्त्वाच्या शहरांत ‘पिंक रिक्षा’ ही योजना लवकरच सुरू करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंगळवारी जाहीर केले. आदिती तटकरे यांच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर याचं स्वागत करण्यात आलेय. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये ही योजना सूरू करणार असून प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, पनवेल, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर व ठाणे या शहरांचा समावेश असू शकतो.

महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी मंत्रालयात आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक बोलाविली होती. या बैठकीत त्यांनी वरील माहिती दिली. यावेळी आदिती तटकरे म्हणाल्या की, ही योजना परिपूर्ण करावी. यामध्ये लाभार्थी निवड, ई-रिक्षाला प्राधान्य देणे, बँका निवड तसेच प्रशिक्षण या सर्व बाबी तपासून घ्याव्यात. प्रायोगिक तत्त्वावर मुंबई, नवी मुंबई, पनवेल, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर व ठाणे या ठिकाणी ही योजना सुरू करण्याचा मानस आहे. महिलांना सॅनिटरी पॅड पुरविण्यासाठी गरजू लाभार्थी निवड-निकष तपासून ही योजनाही यशस्वीपणे राज्यात राबवावी, अशा सूचना आदिती तटकरे यांनी दिल्या. लैंगिक अत्याचार आणि बलात्कारांपासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने रांचीमध्ये पहिल्यांदा गुलाबी रिक्षा 2013 ला सुरू केली होती. कालांतराने त्या भारतातील इतर अनेक शहरांमध्ये सादर करण्यात आल्या. कायदेशीर पडताळणी आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर प्रशिक्षित व्यावसायिक, मुख्यत्वे महिला या ऑटो चालवतात

COMMENTS