पंतप्रधान मोदी आजपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंतप्रधान मोदी आजपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. ते संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सहभागी होणार आहेत.या बैठकीसाठी जगभरातील १००

जागतिक अर्थव्यवस्थेत भारत तिसर्‍या क्रमाकांवर येईल
इंडिया आघाडीची 4 जूनला ‘एक्सपायरी डेट’
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार ?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. ते संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सहभागी होणार आहेत.या बैठकीसाठी जगभरातील १०० देशांचे प्रमुख नेते अमेरिकेला जाणार आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी २५ सप्टेंबरच्या एका चर्चासत्रादरम्यान मोदी संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधित करणार आहेत. तर २४ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेणार आहेत.

यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुमा आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन उपस्थित राहणार आहेत.या परिषदेद्वारे पहिल्यांदाच सर्व देशाचे नेते एकमेकांसमोर येणार आहेत. बैठकीत तंत्रज्ञान, कनेक्टिव्हिटी, पायाभूत सुविधा, सायबर सुरक्षा, हवामान बदल, शिक्षण अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जो बायडन यांनी पद सांभाळल्यानंतर त्यांची भेट घेण्याची पंतप्रधान मोदी यांची पहिलीच वेळ असणार आहे.

COMMENTS