स्मार्ट सिटीसाठी खोदलेले रस्ते झटपट पूर्ण करा – अंबादास खैरे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्मार्ट सिटीसाठी खोदलेले रस्ते झटपट पूर्ण करा – अंबादास खैरे

नाशिक : स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरात खोदलेले रस्ते पूर्ववत करावे अन्यथा शहरात स्मार्ट सिटीचे एकही काम होऊ देणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादी युवक का

सफाई कामगारांच्या तुटवड्यामुळे नागरिकांनाच करावी लागते रस्त्याची स्वच्छता
दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच
कृष्णा कारखाना निवडणुकीसाठी काँग्रेसचे अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा संस्थापक पॅनेलला पाठिंबा

नाशिक : स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरात खोदलेले रस्ते पूर्ववत करावे अन्यथा शहरात स्मार्ट सिटीचे एकही काम होऊ देणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे व त्यांच्या शिष्टमंडळाने स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांना निवेदनाद्वारे दिला.

नाशिक शहरातील चांगले रस्ते खोदण्याचे काम स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड कडून सुरु आहे. एमजी रोड येथील एकही खड्डा नसलेला रस्ता गॅस पाईपलाईन, वायरी व पावसाळी गटार या कामांच्या नावाखाली खोदण्यात आला असून गेल्या आठवड्याभरापासून त्याचे काम थांबल्याने नागरिकांना गैरसोय होत आहे. गंगाघाट शेजारील रस्ता पावसाळी गटार व पाईपलाईन करिता खोदण्यात आला होता सदर रस्त्याकरिता आठ महिन्याहून अधिक कालावधी लागला. सदरचा रस्ता सद्यस्थितीत मुरूम टाकून बुजविण्यात आला असून पावसामुळे या परिसरात चिखल साचले आहे. गंगाघाट परिसर भाविकांनी गजबजलेला असल्याने विकास कामांच्या नावाखाली खोदण्यात आलेल्या रस्त्यांमुळे भाविकांची गैरसोय होत आहे. नाशिक शहरातील विविध ठिकाणी विकास कामांच्या नावाखाली खोदण्यात आलेले रस्त्यांचे काम तातडीने करण्यात येऊन रस्ते पूर्ववत करावे, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक शहरातील एकही काम होऊ देणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

COMMENTS