नेवासा येथे आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेवासा येथे आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

नेवासाफाटा(प्रतिनिधी) नेवासा येथील प्राथमिक शिक्षक बँक नेवासा शाखा सभागृहात आदर्श बहुजन शिक्षक संघ(इब्टा)बहुजन मंडळ नेवासा यांच्या वतीने आयोजित कर

दिगंबरा..दिगंबरा श्रीपाद वल्लभ..दिगंबरा..चा जयघोष, फटाक्यांची आतषबाजी करत देवगड दत्त मंदिर भाविकांसाठी खुले
हॉटेल चालकांचा प्रामाणिकपणा, हॉटेलमध्ये विसरलेले ५ तोळे सोन्यासह २० हजाराची रोख रक्कम केली परत
विविधरंगी गणेशमूर्तींनी सजल्या नेवासा येथील बाजारपेठा

नेवासाफाटा(प्रतिनिधी)

नेवासा येथील प्राथमिक शिक्षक बँक नेवासा शाखा सभागृहात आदर्श बहुजन शिक्षक संघ(इब्टा)बहुजन मंडळ नेवासा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरण आणि नवोदय विद्यालय गुणवंत विद्यार्थी व जिल्हा पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी कोरोना काळात कर्तव्य बजावत असताना अनेक शिक्षकांना आपला जीव गमवावा लागला त्या सर्व दिवंगत गुरुजनांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी श्रीमती सुमित्रा छजलाने यांनी आपल्या सुंदर आवाजात स्वागत गीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष उत्तरेश्वर मोहळकर हे होते.नेवासा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष गौतम मिसाळ, बहुजन मंडळाचे अध्यक्ष एकनाथ व्यवहारे,आबा लोंढे,महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य रमेश सोनवणे,राहाता तालुकाध्यक्ष सतीश मुन्तोडे,विजय गागरे,गौतम भालेराव, शिक्षक बँकेचे संचालक राजेंद्र मुंगसे,श्रीरामपूर शिक्षक बँकेचे संचालक नानासाहेब बडाख, दशरथ ढोले, संतोष ढोले, अविनाश भालेराव आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या आणि नवोदय विद्यालय येथे निवड झालेली विद्यार्थिनी कु.समृद्धी सुनिल गायकवाड हिच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन आणि राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बहुजन मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष रामभाऊ गवळी यांनी केले. संचालक नानासाहेब गडाख, राजेंद्र मुंगसे आदींनी आदर्श बहुजन शिक्षक संघाच्या उपक्रमा बद्दल संघटनेचे कौतुक केले व कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक रविंद्र पागिरे यांचा फेटा, शाल, पुष्पगुच्छ व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या समृद्धी सुनील गायकवाड जि.प.प्राथ. शाळा आढाववस्ती,विराज किरण सातपुते जि. प. प्राथ. शाळा गोंडेगाव,वैष्णव चंद्रकांत देवढे जि. प. प्राथ. शाळा पाथरवाला,श्रावणी शरद सोनवणे,जि.प. प्राथ.शाळा दत्तवाडी चांदा हायस्कूल,श्रेयस बळीराम लोंढे, जि.प. प्राथ. शाळा कुकाणा हायस्कूल,प्रणव संदिप थोरात अंतरवली इंग्लिश मिडीयम,आयुष अशोक कानवडे

घाडगे पाटील विद्यालय नेवासा,वेदांत काकासाहेब गायकवाड घाडगे पाटील विद्यालय नेवासा,श्रुती संजय गडाख घाडगे पाटील विद्यालय नेवासा,समर्था आशिष भारती त्रिमूर्ती इंटरॅशनल या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे

श्रीमती सुमित्रा सुदेश छजलाने,श्रीमती सुप्रिया झिंजुर्डे, श्रीमती.रुपाली खेडकर,श्रीमती सुरेखा गायकवाड,

श्रीमती शोभा आव्हाड,श्रीमती. मनीषा जवणे,श्रीमती मनीषा डावरे,श्रीमती कविता चव्हाण,श्रीमती फौजिया पठाण यांच्यासह वाडी वस्तीवर काम करणाऱ्या महिला शिक्षिकांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

पुरस्कार प्राप्त शिक्षिकांपैकी श्रीमती सुप्रिया झिंजुर्डे, सौ.मनीषा डावरे, श्रीमती सुमित्रा छजलाने आदींनी मनोगत व्यक्त केले.सुमित्रा छजलाने यांनी सादर केलेल्या पोवाड्याने व सुप्रिया झिंजुरडे यांनी सादर केलेल्या स्वरचित ओवीगीताने उपस्थितांची मने जिंकली 

गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे यांनी आदर्श बहुजन शिक्षक संघटनेच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल संघटनेचे कौतुक केले. वाडी वस्तीवरील शिक्षकांना प्रेरणा देण्याचे काम आदर्श बहुजन शिक्षक संघटनेने केल्यामुळे संघटनेच्या नेवासा तालुका कार्यकारणीचे सर्व महिला भगिनींनी अभिनंदन केले. 

यावेळी गटशिक्षणाधिकारी श्रीमती सुलोचना पटारे म्हणाल्या की वेळेचे नियोजन करून वेळ आणि कामाची सांगड घालून चालत राहण्याचे आवाहन केले. यश निश्चितपणे आपल्या मागोमाग चालत येईल तसेच यशाला शॉर्टकट नसतो अशा प्रकारचे मौलिक मार्गदर्शन केले. 

बहुजन मंडळाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ व्यवहारे यांनी बहुजन मंडळाची भूमिका ध्येय आणि धोरणे आगामी भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी गौतम मिसाळ जिल्हाध्यक्ष अहमदनगर, रमेश सोनवणे व उत्तरेश्वर मोहोळकर* आदींनी बहुजन मंडळ व संघटनेचे उपक्रम समाजातील चालीरीती रूढी परंपरा महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांचे कार्य, पुरस्कारार्थी निवड इत्यादीवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील गायकवाड यांनी केले तर रामभाऊ गवळी यांनी आभार मांनले 

या कार्यक्रमाला भागवत लेंडे, सुभाष बगनर, रवींद्र रूपवते, अरुण मोकळ,सुहास पवार,विजय काटकर, कुमार कानडे,अशोक नेवसे,बाळासाहेब मोरे,संतोष कुमार शिंदे,सुभाष भिंगारदिवे,नवनाथ अडसूळ,रामभाऊ गवळी, संजयकुमार लाड,सुनील गायकवाड, रविंद्र चौरे,चंदन सर,नितीन गायकवाड,नवनाथ फुलारी, किशोर गव्हाणे,संतोष जाधव,संजय आगळे,श्रीमती विमल देवकर,श्रीमती अर्चना आगळे,श्रीमती सीमा खंडागळे, लोखंडे सर, शाम फंड,श्री दापके सर, बथुवेल हिवाळे,

श्री भालेराव सर, श्री संतोष ढोले सर,श्री देवढे सर, श्री कानडे सर, श्री गायकवाड सर, आदी शिक्षक बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

COMMENTS