निळ्या भातानंतर हिरव्या आणि तांबड्या भातांच्या लागवडीने रंगीबेरंगी चव खवय्यांना मिळणार

Homeमहाराष्ट्रसातारा

निळ्या भातानंतर हिरव्या आणि तांबड्या भातांच्या लागवडीने रंगीबेरंगी चव खवय्यांना मिळणार

महाबळेश्‍वर तालुक्यात कृषी विभागाचा उपक्रम ठरणार अव्वल पाचगणी / वार्ताहर : निळ्या भाताच्या लागवडीनंतर आता महाबळेश्‍वर तालुक्यात पुन्हा (ग्रीन राईस

सराफा व्यापार्‍यांचे 30 लाखांचे अर्धा किलो सोनं घेऊन बंगाली कारागीर पसार.!
व्हॅलेंटाईन डे निमित्त सह्याद्री देवराईकडून हडपसरच्या वडाला सातार्‍यात पुनर्रोपणाद्वारे जीवदान
हरिभाऊ धाडगे व अशोक कराळे यांची मोटारसायकलवर चारीधाम यात्रा


महाबळेश्‍वर तालुक्यात कृषी विभागाचा उपक्रम ठरणार अव्वल

पाचगणी / वार्ताहर : निळ्या भाताच्या लागवडीनंतर आता महाबळेश्‍वर तालुक्यात पुन्हा (ग्रीन राईस व रेड राईस) हिरव्या तांबड्या भाताची लागवड झाल्याने नेहमीच पांढरा भात खाणार्‍या खवव्यांना या निमित्ताने रंगीबेरंगी रंगाच्या भाताची चव चाखता येणार असल्याने महाबळेश्‍वर कृषी विभागाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे तालुक्यातील शेतकर्‍यांना आर्थिक बाबतीत नक्कीच उभारी मिळेल.

महाबळेश्‍वर तालुका तसा शेतीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी नेहमीच अग्रेसर. येथील अल्हाददायक व पोषक वातावरण नेहमीच साद घालत असते. त्यामुळेच तालुका कृषी विभाग शेतकर्‍यांच्या साह्याने येथील शेतीत नवनवीन कृषी उपक्रम राबवित आहे. नुकतीच निळ्या भाताची लागवड बिरमनी येथे करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर आता हिरव्या आणि निळ्या भाताची लागवड गादी वाप्यांच्या माध्यमातून बिरवाडी, ता. महाबळेश्‍वर येथील शेतकरी समीर चव्हाण यांच्या शेतात एसआरटी म्हणजे सगुणा भात तंत्रज्ञान पध्दतीचा अवलंब करून कृषी विभागाने या तांबड्या व हिरव्या भाताची लागवड केली आहे.

यावेळी कृषी उपसंचालक विजय राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी वाई, चंद्रकांत गोरड, तंत्र अधिकारी सातारा महामुलकर, कृषी अधिकारी राजेंद्र देशपांडे, मंडल कृषी अधिकारी बुधावले यांच्या हस्ते हिरव्या (ग्रीन) भाताची लागवड करण्यात आली.

महाबळेश्‍वर तालुक्यात (ग्रीन राईस व रेड राईस) हिरव्या भात व तांबड्या भाताचे वाण कृषी सहाय्यक दीपक बोर्डे यांनी उपलब्ध करून दिले आहेत. 

आतापर्यंत आपण आरोग्यवर्धक म्हणून ग्रीन टी पसंती देत होतो. त्यासोबतीला आता ग्रीन राईस आला आहे. तर दुसर्‍या बाजूला रेड राईस म्हणजे तांबडा भात, तर या आगोदरच निळा भात आल्याने तर पारंपारिक पांढरा भात आहेच त्यामुळे आता रंग टाकून भाताला रंगीबेरंगी बनविण्याचे दिवस संपले. आता मूळ रंगाच्या रंगीबेरंगी भाताची न्यारीच चव घेता येणार आहे.

महाबळेश्‍वर तालुका शेतीच्या नवनवीन प्रयोगासांठी नेहमीच कौतुक पात्र ठरला आहे. येथील वातावरण सुध्दा पोषक असल्याने कृषी विभाग येथील मिळत्या जुळत्या परिस्थितीचा फायदा घेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे. यातून येथील शेतकर्‍यांना आर्थिक सुबत्ता मिळेल. 

(कृषी सहायक दीपक बोर्डे महाबळेश्‍वर)

COMMENTS