Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेड उपलब्धतेसाठी नोडल अधिकारी नियुक्त

दिवसागणिक वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सुविधेवर मोठा ताण येत आहे.

इस्त्रायलकडून हमासला चोख प्रत्युत्तर
Ahmednagar : दुकान बंद करण्यास सांगणाऱ्या मुख्याधिकाऱ्याला धक्काबुक्की | LOKNews24
प्रेम भक्ती व शक्तीचा त्रिवेणी संगम म्हणजेच भागवत ग्रंथ-भागवताचार्य  सचिन  महाराज सपकाळ

मुंबई/प्रतिनिधी: दिवसागणिक वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सुविधेवर मोठा ताण येत आहे. त्यातच काही खासगी रुग्णालयांमध्ये सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनीही बेड अडवून ठेवले आहेत. यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रात्रीच्या वेळेत रुग्णांना तातडीने बेड उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डात नोडल अधिकार्‍यांची नियुक्ती केली जाणार आहे. 

मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे. कोरोना रुग्णांमध्ये ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यास त्यांना तातडीने उपचाराची गरज लागते; मात्र अनेकदा बेड मिळत नाही. रात्रीच्या वेळेस बेड मिळवताना रुग्णांना प्रचंड त्रास होतो. लोकांना होणारा हा त्रास कमी व्हावा, म्हणून नोडल अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यानुसार, मुंबई महापालिकेच्या 24 वॉर्डातील ’वॉर रूम’ व जम्बो फिल्ड हॉस्पिटलसाठी हे नोडल अधिकारी काम करतील. विशेषत: रात्री 11 ते सकाळी 7 या वेळेत रुग्णांना लवकरात लवकर बेड कसा मिळेल हे पाहण्याची जबाबदारी या अधिकार्‍यांवर असणार आहे. हे अधिकारी दुपारी 3 ते रात्री 11 आणि रात्री 11 ते सकाळी 7 अशा दोन शिफ्टमध्ये काम करतील. ’हे नोडल अधिकारी सातत्याने एकमेकांच्या संपर्कात राहून रुग्णांच्या बेडची व्यवस्था करतील,’ असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये 325 अतिरिक्त आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली असून एकूण आयसीयू बोडची संख्या दोन हजार 466 वर गेली आहे. मुंबईत येत्या दीड महिन्यात आणखी तीन ठिकाणी जम्बो कोविड सेंटर उभी राहणार असून याद्वारे दोन हजार बेड उपलब्ध होणार आहेत. यातील 70 टक्के बेड ऑक्सिजनचे असतील आणि 200 बेड आयसीयूचे असतील.

COMMENTS