नगर अर्बन प्रकरणातील डॉक्टरांचे जामीन फेटाळले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर अर्बन प्रकरणातील डॉक्टरांचे जामीन फेटाळले

अहमदनगर/प्रतिनिधी- नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणातील तीन डॉक्टरांचे जामीन अर्ज फेटाळले असून, त्यांना दुसर्‍या गुन्ह्यामध्ये आता वर्ग केले जाणार आहे. डॉ

नव्या केंद्रीय सहकार मंत्रालयाचे नगरमधून स्वागत
घोटाळेबाज पुन्हा नगर अर्बनमध्ये येण्याच्या तयारीत ?; बँक बचावच्या गांधींनी दिले खुल्या चर्चेचे आव्हान
नगर अर्बनच्या मतदारयादीवरील हरकतींवर उद्या होणार सुनावणी

अहमदनगर/प्रतिनिधी- नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणातील तीन डॉक्टरांचे जामीन अर्ज फेटाळले असून, त्यांना दुसर्‍या गुन्ह्यामध्ये आता वर्ग केले जाणार आहे. डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. भास्कर सिनारे, डॉ. रवींद्र कवडे यांचा या आरोपींमध्ये समावेश आहे. नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या 22 कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या या तीन डॉक्टर आरोपींचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले आहे. त्यामुळे आता येथील आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाद्वारे शहर सहकारी बँकेच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये या तीन आरोपींना वर्ग करणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी दिली. शहर सहकारी बँकेच्या पाच कोटी 75 लाख रुपयांच्या प्रकरणांमध्ये तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झालेले आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी आता या डॉक्टरांना या बँकेच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वर्ग केले जाणार असून न्यायालयाने त्याबाबतची परवानगी दिली असल्याची माहिती उपअधीक्षक सोनवणे यांनी दिली. येत्या दोन दिवसांमध्ये त्यांना पुन्हा न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे. नगर अर्बन कॉपरेटिव्ह बँकेच्या 22 कोटी 93 लाख रुपयांचा घोटाळा प्रकरणात पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर त्यांनी जामीनासाठी अर्ज केले होते. पण न्यायालयाने ते फेटाळले.

COMMENTS