Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माऊली दादा आणि सुदामदेव बाबा एकाच नाण्याच्या दोन बाजु-लक्ष्मण महाराज मेंगडे

बीड प्रतिनिधी - विसाव्या शतकातील एक महान संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या तेविसाव्या पुण्यतिथी निमित्त ह. भ. प महादेव महाराज तात्या, ह. भ

‘फरार’ परमबीर सिंग अखेर चौकशीला गेले सामौरे
बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी रेमो डिसूझासोबत खेळणार गरबा.
भाजपात घडणार मोठा भूकंप… संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना…

बीड प्रतिनिधी – विसाव्या शतकातील एक महान संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या तेविसाव्या पुण्यतिथी निमित्त ह. भ. प महादेव महाराज तात्या, ह. भ. प नारायण महाराज भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली चालु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पहील्या दिवसाची किर्तन सेवा ह. भ. प लक्ष्मण महाराज मेंगडे यांची गोड सेवा संपन्न झाली. महाराजांनी आपल्या वाणीतून भाविकांना मंत्रमुग्ध केले.आज माऊली दादांची तेविसावी पुण्यतिथी आहे. पण दादाची आज पुण्यतिथी आहे असे वाटत नाही.दादा आपल्यात आहे असे वाटत आहे.  माऊली दादा आणि सुदामदेव बाबा एका नाण्याच्या दोन बाजु आहेत. असे महाराजांनी आपल्या वाणीतून भाविकांना संदेश दिला.
सदानाम घोष करु हरी कथा, लेणे माझ्या चित्ता समाधान ॥धृ॥
सर्व सुखाल्यालो अलंकार, आनंद निर्भय डुलतसे ॥1॥
असो ऐसा कोठे आठवच नाही, देहीच विदेही भोगू दशा ॥2॥
तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप, लागो नाही अंगा पाप पुण्या ॥3॥
सदा नाम घोष करु हरी कथा या अभंगातून भाविकांना मंत्रमुग्ध केले. दादांचे किर्तन एकायला सुरवात झाली की सर्व श्रोते तल्लीन व्ह्यायचे. दादा कीर्तनाच्या शेवटी राम कृष्ण हरी भजन गायन करायचे.दादा माऊलींनी नारळ आणि शंभर रुपये दिलेले अजुन सुध्दा जपून ठेवले आहेत महाराजांनी आपनासोबत घडलेला प्रसंग आणि दादांची आठवण सांगितली. सन्मानाची वागणूक भेटणारे एकमेव ठिकाण म्हणजे माऊली दादांची श्री क्षेत्र चाकरवाडी. महाराष्ट्रामधील नव्हे तर देशातील एकमेव 24 तास अन्नदान सुरू असणारे ठिकाण म्हणजे दादांच्या पदस्पर्शाने पावन पुनित झालेली भूमि श्री क्षेत्र चाकरवाडी आहे. संताचे अंतकरण हे नवनीता सारखे असते.
यावेळी उपस्थित महाराष्ट्र ज्यांना मृदुंग महामेरू म्हणुन ओळखतो असे राम महाराज काजळे भाऊ, नाना महाराज कदम,  अच्चुत महाराज घोडके, दिनेश महाराज काळे, पांडुरंग महाराज शिंदे, पिसे महाराज, राम महाराज गायकवाड, बिभिशेन महाराज कोकाटे, माऊली महाराज औटे, संजय महाराज देवकर, अमोल महाराज पवार तसेच आदर्श पोलिस पाटील नानासाहेब काकडे, सरपंच विनोद कवडे, पत्रकार अभिजीत पवार, मिथुन पवार, मांचिक पवार, माजी सरपंच चत्रभूज पवार, परमेश्वर भोसले सर  पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त उपस्थित होते.

COMMENTS