नगरमधील सहा रुग्णालयांना नोटिसा, पैसे परत करण्याचेही आदेश

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरमधील सहा रुग्णालयांना नोटिसा, पैसे परत करण्याचेही आदेश

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील 300 रुग्णांचा लाभ प्रतीक्षेत, मनसेचा पाठपुरावाअहमदनगर- महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातील 300

Ahmednagar : अहमदनगर मधील सीना नदीला पूर वाहतूक ठप्प l LokNews24*
भूसंपादनाचे पैसे गायब…मनपा बजेट चर्चाही स्थगित
जय हिंद फाउंडेशनने पाथर्डी तालुक्यात लावली सर्वाधिक वडाची झाडे

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील 300 रुग्णांचा लाभ प्रतीक्षेत, मनसेचा पाठपुरावा
अहमदनगर- महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातील 300 कोरोना आजारावर उपचार घेतलेल्या रुग्णांनी अर्ज सादर केले असून त्या अर्जांची दखल घेऊन राज्य आरोग्य हमी सोसायटी यांनी शहरातील सहा रुग्णालयांना या रुग्णांच्या तक्रारी निकाली काढण्याचे आदेश नोटिसीद्वारे दिले आहेत व त्यामध्ये रुग्णांवरील उपचाराचे सर्व पैसे परत करण्याचे आदेश सुद्धा या नोटीसमध्ये दिलेले आहेत. मनसेने याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यामुळे यश येण्याची चिन्हे असून, कोरोना उपचार घेतलेल्या रुग्णांना लाखो रुपये परत मिळण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी दिलेली माहिती अशी की, महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये लाभ मिळावा यासाठी सर्व कोरोना आजारावर उपचार घेतलेल्या रुग्णांची बिले परत देण्यासाठी मनसेने आवाहन केल्यानंतर जिल्ह्यातून सुमारे 300 अर्ज महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सादर झाले आहेत. यामध्ये सर्व रुग्णांनी ज्या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना लाभ मिळतो, अशा हॉस्पिटलमध्ये हे अर्ज सादर केलेले असून या हॉस्पिटलकडून आपल्या उपचारावर खर्च झालेली संपूर्ण रक्कम परत मिळविण्यासाठी व शासनाकडून महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळविण्याची मागणी मनसेच्या आवाहनानंतर केली आहे. याच अनुषंगाने या 300 अर्जांच्या प्रती मिळाल्यानंतर राज्य आरोग्य हमी सोसायटी यांनी सर्व संबंधित हॉस्पिटलला या अर्जांद्वारे मांडलेल्या तक्रारी निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत व त्यामध्ये रुग्णांचे संपूर्ण पैसे परत करण्याचे आदेश सुद्धा या या नोटीसमध्ये दिलेले आहेत.

पाच हॉस्पिटलचा समावेश
महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील हॉस्पिटलमध्ये ज्या रुग्णांनी कोरोना आजारावर उपचार घेतले, अशा रुग्णांचे पैसे सुद्धा परत मिळू शकतात, ही बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उघड केल्यानंतर व महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये सर्व रुग्णांना लाभ मिळू शकतो असे आवाहन केल्यानंतर एक ते दीड महिन्यात जिल्ह्यातून व शहरातून 300 अर्ज दाखल झालेले आहेत व त्यामध्ये नगर शहरातील जवळपास 210 अर्ज या योजनेमध्ये सहा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहे. शहरातील नोबेल हॉस्पिटलला 80 अर्ज, आनंदऋषीजी हॉस्पिटल 47 अर्ज, साईदीप हॉस्पिटल 43 अर्ज, स्वास्थ्य हॉस्पिटल 12 अर्ज, अनभुले हॉस्पिटल 2 अर्ज व विखे पाटील विळद घाट हॉस्पिटल 35 अर्ज आले आहेत. नगर शहरातील संबंधित हॉस्पिटलमध्ये तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजना ऑफिस सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी हे अर्ज सादर झालेले असून बाकीचे अर्ज जिल्ह्यातील इतर हॉस्पिटलमधील आहेत.

…तर, गुन्हे दाखल करणार
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आलेल्या अर्जांचे पैसे परत केले नाही तर संबंधित हॉस्पिटलच्या विरोधात मनसे गुन्हे दाखल करणार असल्याचे जिल्हा सचिव भुतारे यांनी सांगितले. उपचार करण्यासाठी बेड देतो परंतु योजनेचा लाभ घेणार नाही, असे अनेक हॉस्पिटलने कोरोना आजारावर उपचार घेणार्‍या रुग्णांकडून लेखी अर्ज घेतले आहेत. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून रुग्णांची अशी अडवणूक व ब्लॅकमेलिंग करणार्‍या हॉस्पिटलच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे, असेही भुतारे म्हणाले.

हॉस्पिटल्सने माहीत दिली नाही
अनेक हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये उपचार सुरू होते परंतु या सर्व हॉस्पिटलने या योजनेची गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांना माहिती दिली नसल्यामुळे या सर्व रुग्णांना कोरोना आजारावर उपचार करण्याचा खर्च व त्याचा त्रास सहन करावा लागला आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत कोरोना आजारावर मोफत उपचार होत असल्यामुळे संबंधित हॉस्पिटलने कोरोना आजारावर उपचार घेणार्‍या रुग्णांकडून पैसे आकारू नयेत तसेच या रुग्णांवर मोफत उपचार करावेत, अशी मागणीही मनसेकडून करण्यात आली होती. पण तिलाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, आता तक्रारी केलेल्या रुग्णांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे, असे भुतारे यांनी सांगितले.

COMMENTS