Homeमहाराष्ट्रअहमदनगर

नगरच्या कलावंताला मिळाला बहुमान ; जगताप यांच्या चित्रांची राष्ट्रीय चित्रप्रदर्शनासाठी निवड

नगरचे हरहुन्नरी युवा चित्रकार प्रमोद जगताप यांच्या चित्रांची सलग दुसर्‍या राष्ट्रीय चित्रप्रदर्शनासाठी निवड झाली आहे.

एसडीआरएफ जवानांच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत
रत्नदीपच्या उपोषणकर्त्या मुला-मुलींचा मोठा भाऊ म्हणून उभा
कोल्हे सहकारी साखर कारखाना कामगार पतपेढीला 46 लाखाचा नफा

अहमदनगर/प्रतिनिधी- नगरचे हरहुन्नरी युवा चित्रकार प्रमोद जगताप यांच्या चित्रांची सलग दुसर्‍या राष्ट्रीय चित्रप्रदर्शनासाठी निवड झाली आहे. दरवर्षी होणार्‍या व भारतातील मानाच्या मानल्या जाणार्‍या दोन राष्ट्रीयस्तराच्या कला स्पर्धांचा निकाल नुकताच हाती आला आहे. त्यातील द् बॉम्बे आर्ट सोसायटीचे (मुंबई) 129 वे कलाप्रदर्शन तसेच आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे (मुंबई) 103 वे कलाप्रदर्शन अशा दोन्ही स्पर्धांसाठी जगताप यांच्या 2 चित्रांची निवड झाली आहे. 

या दोन्ही स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून सुमारे 4000 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यातून केवळ 350 ते 400 कलाकारांच्या चित्रांचीच निवड करण्यात आली. यात जगताप यांच्या चित्रांचा समावेश आहे. यातील ब्रिदिंग लाईटस नावाचे चित्र द् बॉम्बे आर्ट सोसायटीसाठी तसेच ब्रिदिंग लाईट्स-4 नावाचे चित्र आर्ट सोसायटी ऑफ इंडियासाठी निवडले आहे.

छायाप्रकाशाची कलात्मक मांडणी

दोन्ही चित्रांमध्ये जगताप यांनी दैनंदिन जीवनात दिसणार्‍या जुन्या पण मोहक अशा इमारती, रोजची कामाची लगबग व त्यातील छायाप्रकाशाची गंमत कलात्मक रित्या चित्रीत केली आहे. यावर्षी कोविडमुळे या दोन्हीही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. निवड झालेल्या सर्व चित्रांचे प्रदर्शन हे त्या-त्या संस्थांच्या संकेत स्थळावर 25 मार्चपासून सुमारे 1 महिन्यापर्यंत चित्ररसिकांना पाहता येणार आहे. अशा मोठ्या स्पर्धांमध्ये चित्रांची निवड होणे हे अहमदनगरसाठी भूषणावह आहे. चित्रकार जगताप यांना यापूर्वी देखील अनेक राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांचा वास्तववादी चित्र काढण्यात हातखंडा आहे.

COMMENTS