बांगला देशाच्या स्वातंत्र्यासाठी माझाही सत्याग्रह : मोदी

Homeमहाराष्ट्रदेश

बांगला देशाच्या स्वातंत्र्यासाठी माझाही सत्याग्रह : मोदी

बांगला देशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात मी सहभागी झालो होतो. माझ्या जीवनातील हे पहिलेच आंदोलन होते.

गृहपाठ केला नाही म्हणून चिमुकलीला बेदम मारहाण.
अच्छे दिन आणणाऱ्या लोकांनी महागाईचे दिन आणले
दिल्लीत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा भीषण अपघात 

ढाका: बांगला देशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात मी सहभागी झालो होतो. माझ्या जीवनातील हे पहिलेच आंदोलन होते. त्या वेळी मी 20-22 वर्षाचा असेल. त्या वेळी माझ्यासह माझ्या अनेक सहकार्‍यांनी बांगला देशाच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 

बांगला देशाच्या स्वातंत्र्य दिनाला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने मोदी बांगला देशाच्या दौर्‍यावर आले आहेत. कोरोना काळातील त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. या वेळी मोदी यांनी शेख मुजीबुर रहमान यांना मरणोत्तर घोषित झालेला गांधी शांती पुरस्कार बांगला देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडे सुपूर्द केला. बांगला देश आणि भारताचे संबंध अधिक दृढ होत आहेत. त्यामुळे मला हा पुरस्कार देताना अत्यंत आनंद होत आहे, असे ते म्हणाले. बांगला देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला बोलावल्याबद्दल राष्ट्रपती अब्दुल हामिद आणि पंतप्रधान शेख हसीना यांचे त्यांनी आभार मानले. या वेळी मोदी यांनी बांगला देशाचे राजकारणी आणि कलाकारांचीही भेट घेतली. बांगला देशातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही ते भेटले. बांगला देशाचा क्रिकेटपटू शाकिब अल हसन याला मोदी भेटले. येथील भारतीयांना भेटतानाच वोहरा समुदायाच्या लोकांचीही त्यांनी भेट घेऊन त्यांच्याशी गुजरातीत संवाद साधला.

COMMENTS