नक्षल्यांना रोखण्यासाठी मास्टर प्लॅन… मुख्यमंत्र्यांनी मागितला १२०० कोटींचा निधी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नक्षल्यांना रोखण्यासाठी मास्टर प्लॅन… मुख्यमंत्र्यांनी मागितला १२०० कोटींचा निधी

प्रतिनिधी : दिल्ली अडीच महिन्यांपूर्वी मराठा आरक्षण आणि अन्य महत्वाच्या मागण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद

महाविकास आघाडी म्हणजे पंक्चर रिक्षा
लडाखमध्ये पाच नव्या जिल्ह्यांची घोषणा  
अमित शाह यांच्याच काळात महाराष्ट्रात २५ वर्ष जुन्या शिवसेना-भाजपा युतीचा तुकडा पडला…

प्रतिनिधी : दिल्ली

अडीच महिन्यांपूर्वी मराठा आरक्षण आणि अन्य महत्वाच्या मागण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता पुन्हा दिल्लीत आले आहे .

यावरून आजच्या बैठकीनंतर अमित शाह यांच्याशीही उद्धव ठाकरें व्यक्तिगत संवाद साधतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

अमित शहा यांच्या आजच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आदी उपस्थित आहेत. 

तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जनगमोहन रेड्डी, केरळचे मुख्यमंत्री ओमाना चांडी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहे .

नक्षलवादी उपद्रवाचे वाढते प्रमाण आणि त्या कशा प्रकारे रोखल्या जाव्यात यासंदर्भात उपाययोजनांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महत्त्वाची बैठक बोलावली. 

या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) उपस्थित होते. राज्याच्या अनुषंगाने ठाकरे यांनी बैठकीत नक्षलवादी भागात विकास (Development in Naxalite areas) करण्यासाठी आणि नक्षल्यांना रोखण्यासाठी 1200 कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी अमित शहांकडे (Amit Shah) केली.

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या सादरीकरणामध्ये दुर्गम भागात नवीन पोलीस पोस्ट स्थापन करणे, नक्षलग्रस्त भागात अधिकाधिक मोबाईल टॉवर बसवणे, नवीन शाळा बांधण्यावर भर देणे आदींसाठी हा निधी लागणार असल्याचे म्हटले आहे .

अमित शहा यांच्या आजच्या बैठकीपूर्वी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत राज्यातील नक्षलवाद विषयक आढावा बैठक घेण्यात आली होती. 

या बैठकीत नक्षलवादी चळवळ आता दुर्गम भागातून शहरांकडे वळत असल्याच्या गंभीर विषयावर चर्चा करण्यात आली .यातील महत्वाचे मुद्दे मुख्यमंत्र्यांनी आज अमित शहा यांच्यासमोर उपस्थित केले .

COMMENTS