देशमुखांचा राजीनामा; वळसे नवे गृहमंत्री ; सीबीआयकडे तपास सोपवण्याच्या निर्णयाला आव्हान देणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशमुखांचा राजीनामा; वळसे नवे गृहमंत्री ; सीबीआयकडे तपास सोपवण्याच्या निर्णयाला आव्हान देणार

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला आहे.

नगर-आष्टी रेल्वे मार्गावर हायस्पीड रेल्वेची यशस्वी चाचणी
प्रेग्नेंट असून दीपिकाने केला डान्स
शुद्ध मनाने काम केले तरच… पवारांनी दिला 8 मान्यवरांना सल्ला

मुंबई / प्रतिनिधी: महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कथित संभर कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणाची चौकशी सीबीआयकडे दिली आहे. त्यानंतर लगेचच देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेऊन राजीनामा सोपवला. दरम्यान, देशमुख दिल्लीला गेले असून उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत.   

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला अनिल देशमुखही उपस्थित होते. देशमुख यांनी पवार यांच्याकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. त्याला त्यांनी संमती दिली. सीबीआयची चौकशी चालू असताना पदावर राहणे योग्य नसल्याचे देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.  देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर गृहमंत्रिपदाची सूत्रे मुख्यमंत्र्यांकडे राहणार आहे. नव्या गृहमंत्र्याबाबत पवार निर्णय घेतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी सांगितले.  देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर पवार यांचे विश्‍वासू दिलीप वळसे-पाटील हे गृहमंत्रिपदाचा कारभार हाती घेणार असल्याची माहिती आहे. त्यांच्या निवडीवर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांनी दिली आहे. उद्या वळसे-पाटील तातडीने या खात्याची सूत्रे हाती घेतील, असे समजते.  सुरुवातीला देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहखाते काही काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राहील, असे म्हटले जात होते; मात्र गृहखात्यासारखे संवेदनशील आणि सामर्थ्यशाली खाते राष्ट्रवादी काँग्रेस इतर कोणाच्याही ताब्यात द्यायला तयार नाही. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून तातडीने देशमुख यांचा उत्तराधिकारी कोण, हे ठरवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. वळसे पाटील यांच्याकडे गृहंमंत्रिपद गेल्यानंतर त्यांच्याकडील उत्पादन शुल्क खाते अजित पवार यांच्याकडे तर कामगार खाते ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे दिले जाण्याची शक्यता आहे. वळसे पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्‍वासू मानले जातात. त्यांना राज्यकारभाराचाही मोठा अनुभव आहे. सध्याच्या परिस्थितीत एक स्वच्छ चारित्र्याच्या नेत्याकडे गृहखाते जाणे राष्ट्रवादी काँग्रेससाठी गरजेचे आहे. त्यामुळे वळसे-पाटलांकडे गृहमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारने गमावला नैतिक अधिकार

अनिल देशमुख प्रकरणात उद्धव ठाकरे सरकारने आपला नैतिक अधिकार गमावल्याचा घणाघात केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला. आम्ही सुरुवातीपासूनच या सर्व प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्याची मागणी करत होतो. हा तपास मुंबई पोलिसांमार्फत शक्य नव्हता. देशमुख यांनी सचिन वाझेला मुंबईतील रेस्टॉरंट आणि बारमधून महिन्याला शंभर कोटीच्या वसुलीचे टार्गेट दिले होते. आम्ही हा विषय उचलून धरला की हे टार्गेट फक्त मुंबई पुरते मर्यादित आहे, की पूर्ण महाराष्ट्रासाठी असे टार्गेट दिले जातं? हे टार्गेट एका मंत्र्याचे होते, तर बाकी मंत्र्याचे टार्गेट काय? असा प्रश्‍नही प्रसाद यांनी पुन्हा विचारला आहे.

COMMENTS