मुंबईत अत्यावश्यक वाहनांसाठी रंगकोड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत अत्यावश्यक वाहनांसाठी रंगकोड

राज्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे टाळेबंदीचे आदेश देण्यात आले आहेत; पण त्यानंतरही मुंबईतील रस्त्यावर विनाकारण फिरणार्‍यांची संख्या लक्षात घेता पोलिसांकडून गाड्यांना वेगवेगळ्या रंगाचे कोड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आईनेच केली २० दिवसांच्या चिमुकलीची हत्या
सावित्रीबाईं फुलेंचे 10 एकरात भव्य स्मारक उभारणार
वैष्णोदेवीनंतर शाहरुख खान साईबाबांच्या नगरीत दाखल

मुंबई/प्रतिनिधी: राज्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे टाळेबंदीचे आदेश देण्यात आले आहेत; पण त्यानंतरही मुंबईतील रस्त्यावर विनाकारण फिरणार्‍यांची संख्या लक्षात घेता पोलिसांकडून गाड्यांना वेगवेगळ्या रंगाचे कोड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील गाड्यांना लाल, हिरवा व पिवळ्या रंगाचे स्टीकर लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आता मुंबईत खासगी वाहनांवर तीन प्रकारचे कलर कोड लागणार आहेत. कलम 144 नुसार मुंबई शहरात फक्त विशिष्ट कलर कोडचे स्टीकर लावणे बंधनकारक आहे. एक मेपर्यंत हे स्टीकर लावणे बंधनकारक आहे. हे स्टीकर वाहनांच्या मालकांनी स्वतः लावायचे आहेत. याशिवाय पोलिसही विविध ठिकाणी अशा स्टीकरचे वितरण करणार आहेत. सहा इंचाचे स्टीकर गोल आकारात गाडीला चिकटवायचे आहेत. वैद्यकीय सेवा देणार्‍या वाहनांना लाल कलर कोड देण्याात आला आहे. त्यात डॉक्टर, रुग्णालय, रुग्णवाहिका, वैद्यकीय वस्तू पुरवठा करणार्‍यांनी लाल रंगाचे स्टीकर लावणे बंधनकारक आहे. याशिवाय महापालिका कर्मचारी, सरकारी कर्मचारी, पत्रकार, पाणी पुरवठा, गॅस सेवा, टेलिफोन सेवा आदींना पिवळे कलर कोड आणि भाज्या, फळे, दुध, बेकरी, खाद्यपदार्थ यांच्याशी संबंधीत वाहनांना हिरवे कलर कोड अशी संकल्पना मुंबई पोलिसांनी समोर आणली आहे. मुंबईतील सध्या वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता मुंबईत विविध निर्बंध आणि कडक नियम लावणे गरजेचे आहे; पण या घोषणेनंतर नागरिकांमध्ये संभ्रमावस्थेत पाहायला मिळाले. या निर्णयामुळे विनाकारण फिरणार्‍यांना किती आळा बसेल हा येणारा काळच ठरवेल. मुंबईतील विविध ठिकाणी टाळेबंदीनंतरही अनेक ठिकाणी नागरिक गर्दी करत आहेत. अशा ठिकाणांची माहिती घेतली जात असून अशा ठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात येणार आहे. चार चाकी गाड्यांच्या पुढच्या व मागच्या दोन्ही स्क्रीन(काचेवर) हे स्टीकर दर्शनीय ठिकाणी चिकटवायचे आहेत. दुचाकीस्वारांनाही हे स्टीकर बसवणे बंधनकारक आहे. त्यांनीही दुचाकीच्या पुढील व मागील बाजूच्या दर्शनीय ठिकाणी हे विविध कलर कोडचे स्टीकर चिकटवायचे आहेत. हे स्टीकर सहा इंच व्यासाचे गोल असावे. स्टीकरशिवाय गाडी चालवणे मुंबईत यापुढे प्रतिबंधीत असेल, तसेच स्टीकरचा गैरवापर केल्यास तोतयागिरी केल्याबाबत गुन्हाही दाखल होऊ शकतो. पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी स्वतः व्हिडिओ जारी करून या नव्या कलर कोडबद्दल माहिती दिली.

COMMENTS