देवरेंविरोधात आंदोलनाचा पीपल्स हेल्पलाईनचा इशारा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवरेंविरोधात आंदोलनाचा पीपल्स हेल्पलाईनचा इशारा

अहमदनगर/प्रतिनिधी- येथील पीपल्स हेल्पलाईनसह भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्यावतीने पारनेर महसुलच्या न्यायविक्रीचा सत्यबोधी सूर्यना

गांधीजींचे  विचारच समाजाला पुढे नेऊ शकतात – प्राचार्य. डॉ.जी. पी. ढाकणे
तलाठ्याच्या वाहनाल ट्रँक्टरची धडक
मुळा धरणातून पारनेर शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर – उपमुख्यमंत्री अजित पवार

अहमदनगर/प्रतिनिधी- येथील पीपल्स हेल्पलाईनसह भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्यावतीने पारनेर महसुलच्या न्यायविक्रीचा सत्यबोधी सूर्यनामा आंदोलन करण्यात येणार आहे. आदिवासी बांधवांच्या जमिनी प्रकरणात तहसीलदार ज्योती देवरे यांनी न्याय विक्री केल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे.

देशात भ्रष्टाचार मुक्तीचा रणसंग्राम पेटविणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या तालुक्यात तहसीलदार देवरे यांनी भ्रष्टाचाराला खतपाणी घातले आहे. अशा भ्रष्टाचार प्रवृत्तीला लगाम लावण्यासाठी व आदिवासी बांधवांच्या जमिनी वाचवण्यासाठी सत्यबोधी सूर्यनामा आंदोलन केले जाणार असल्याचे या संघटनांचे प्रमुख अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी म्हटले आहे. या आंदोलनात बाबा आरगडे, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे, अंबिका नागुल, विठ्ठल सुरम, अशोक भोसले सहभागी होणार आहेत. याबाबत अ‍ॅड. गवळी यांनी सांगितले की, सर्व आदिवासी बांधव व संघटनांना बरोबर घेऊन तहसीलदार देवरे यांच्या विरोधात आक्रोश आंदोलन केले जाणार आहे.

याबाबत अ‍ॅड. गवळी यांनी सांगितले की, देवरे यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी 6 ऑगस्ट रोजी तयार करुन नाशिकच्या विभागीय आयुक्तांना पाठविला होता. या अहवालानुसार विभागीय आयुक्तांनी देवरे यांना दोषी धरत कारवाईचा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठविला आहे. अशा अनेक प्रकरणात देवरे दोषी असून, महसूल न्याय विक्रीचा त्यांनी उच्चांक गाठला आहे. त्यांनी पन्नास वर्षापूर्वी मृत झालेल्या आदिवासी व्यक्तीविरोधात खटला चालवला. या प्रकरणात मृत व्यक्तीच्या वारसांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांना हाकलून लावण्यात आले. पारनेर तालुक्यात तहसीलदारांनी पदाचा दुरोपयोग करुन अनागोंदी माजवली आहे. तर टाळेबंदीत पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक करण्यात आली. यामध्ये या भागातील अनेक रस्ते वाळूच्या डंपरमुळे खराब झाले आहेत. गैरकारभारातून त्यांनी कोट्यावधीची माया जमवली असल्याचा आरोप अ‍ॅड. गवळी यांच्यासह त्यांच्या संघटनांच्यावतीने करण्यात आला आहे.

COMMENTS