त्या इंजेक्शनचा काळाबाजार रोखा

Homeताज्या बातम्याअहमदनगर

त्या इंजेक्शनचा काळाबाजार रोखा

काळाबाजार होऊ नये म्हणून म्यूकर माइकोसिस आजारासाठीच्या ’अँफोनेक्स’ इंजेक्शन जिल्हाधिकारी यांनी ताब्यात घेऊन त्यांच्याच मार्फत रुग्णांपर्यंत पोहोचवावेत, अशी मागणी ऑल इंडिया युथ फेडरेशनचे

गुरुवर्यांच्या हस्ते झालेला सत्कार सेवाकार्याला बळ देणारा
जिल्हास्तरीय तलवार बाजी स्पर्धेत रोहमारे महाविद्यालयाच्या खेळाडूंचा विजय
सेवाभावी पुरस्कार आणि ग्रंथप्रकाशनच खरे पुण्यस्मरण ः काका कोयटे

 अहमदनगर/प्रतिनिधी- काळाबाजार होऊ नये म्हणून म्यूकर माइकोसिस आजारासाठीच्या ’अँफोनेक्स’ इंजेक्शन जिल्हाधिकारी यांनी ताब्यात घेऊन त्यांच्याच मार्फत रुग्णांपर्यंत पोहोचवावेत, अशी मागणी ऑल इंडिया युथ फेडरेशनचे फिरोज़ शेख यांनी केली आहे.  

यात त्यांनी म्हटले आहे की, नगर शहरांमध्ये नवीन आजार म्यूकर माइकोसिसचे काही रुग्ण आढळून आले आहेत. त्या रुग्णांसाठी ’अँफोनेक्स’ इंजेक्शनची व औषधोपचारासाठी गरज असते. मात्र, त्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे. मेडिकल मार्केटमध्ये ’अँफोनेक्स’ इंजेक्शन कमी प्रमाणात उपलब्ध आहे. या रोगाचे रुग्ण व इंजेक्शनची उपलब्धता पाहता त्याचाही काळाबाजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ’अँफोनेक्स’ इंजेक्शन जिल्हाधिकारी म्हणून ताब्यात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत थेट रुग्ण व संबंधित हॉस्पिटलला द्यावेत. त्यामुळे ते रुग्णांना विनासायास मिळतील व त्यांचा काळाबाजार होणार नाही, असे म्हणणे त्यांनी यात मांडले आहे. तसेच हे सर्व जिल्हाधिकार्‍यांच्या नियंत्रणात राहून रुग्णांच्या नातेवाईकांना जो त्रास होणार आहे ते कुठेतरी थांबेल आणि जिल्हाधिकार्‍यांमार्फत योग्य न्याय मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS