तिस-या लाटेचा धोका लक्षात घेता, औदयोगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये  कोविड सेंटर सुरू करा :विवेकभैया कोल्हे

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

तिस-या लाटेचा धोका लक्षात घेता, औदयोगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये कोविड सेंटर सुरू करा :विवेकभैया कोल्हे

कोरोना आजाराचा सध्या देशभर प्रादुर्भाव होत असून या आजाराच्या तिस-या लाटेमध्ये लहान मुलांना बाधा होण्याची दाट शक्यता आहे.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाला बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक
आनंदऋषीजीमध्ये एका महिन्यात 2401 मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा विक्रम
*Ahmednagar : पाच वर्षांच्या बालकाला बिबट्याने धरले जबड्यात आईने केले ‘असे’ काही की

कोपरगाव शहर प्रतिनीधी- कोरोना आजाराचा सध्या देशभर प्रादुर्भाव होत असून या आजाराच्या तिस-या लाटेमध्ये लहान मुलांना बाधा होण्याची दाट शक्यता आहे. या तिस-या लाटेचा संभाव्य धोका विचारात घेउन लहान मुलांच्या उपचारासाठी शासनाने औदयोगिक प्रशिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीमध्ये अदययावत कोविड सेंटर सुरू करावे, प्राधान्याने नगरपालिकेने या ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक विवेकभैया बिपीनदादा कोल्हे यांनी केली.
कोपरगाव शहरालगत असलेल्या औदयोगिक प्रशिक्षण संस्थेची भव्य इमारत उभी आहे, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक श्री विवेक कोल्हे यांनी आज या इमारतीची पहाणी केली. कोटयावधी रूपये खर्चून उभारण्यात आलेल्या या इमारतीचे काम पुर्ण झाले असुन  गेल्या अनेक वर्षापासून सदरची इमारत वापराविना पडून आहे. सध्या देशासह राज्यामध्ये कोरोना महामारीचे संकट आलेले आहे. या महामारीची तीव्रता मोठी असल्याने वैदयकिय यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. आॅक्सीजन बेड, औषधे आदी वैदयकिय सुविधा कमी पडल्याने रूग्णांसह नातेवाईकांची मोठया प्रमाणात हाल होत आहे. वैदयकिय सुविधा अपु-या पडल्यामुळे अनेक रूग्ण या महामारीत दगावले आहे. उपचारादरम्यान पुरेशा वैदयकिय सुविधा मिळाव्या म्हणून शासकीय यंत्रणेबरोबर विविध सामाजिक संस्थांनीही या मध्ये भाग घेतला, त्यामुळे रूग्णसंख्या कमी होण्यास निश्चितच मदत झाली आहे.
कोरोना आजाराची संभाव्य तिस-या लाटेविषयी सध्या चर्चा सुरू असुन ही लाट इतर दोनही लाटेपेक्षा भयंकर असल्याचे मत वैदयकिय तज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे प्रशासनानेही या संकटाला सामोरे जाण्यासाठी उपाययोजना करण्याचे नियोजन सुरू केले आहे. या तिस-या लाटेमध्ये लहान मुलांना मोठया प्रमाणात बाधा होणार असल्याचे वर्तविले जात आहे. या पार्श्वभूमीवर श्री कोल्हे यांनी कोपरगाव येथील औदयोगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीची पहाणी केली. कोटयावधी रूपये खर्चून उभारण्यात आलेली ही इमारत गेल्या अनेक वर्षापासून वापराविना पडून आहे. भव्य असलेल्या इमारतीमध्ये अदययावत कोविड सेंटर उभारल्यास शहरासह तालुक्यातील रूग्णांना याचा मोठा फायदा होईल. तिस-या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेउन या भव्य अषा इमारतीमध्ये शासनाने कोविड सेंटर उभारावे, या कामी कोपरगाव नगरपालिकेने पुढाकार घेउन हे कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी श्री विवेक कोल्हे यांनी केली.

COMMENTS