Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केंद्र प्रमुखपदी ९५ पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक यांना पदोन्नती 

नाशिक : शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत कार्यरत असलेले प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) व मुख्याध्यापक पदावरुन केंद्रप्रमुख

 दिल्ली येथे केंद्रीय मंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे यांची कार्य तत्परता
संजय राऊतांची होणार शिवसेनेतून हकालपट्टी ?
कोरोनानंतर पुढील उपचारासाठी सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल

नाशिक : शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत कार्यरत असलेले प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) व मुख्याध्यापक पदावरुन केंद्रप्रमुख पदोन्नती मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली समपुदेश दिनांक ०४-०३-२०२४ रोजी जुने सभागृह जिल्हा परिषद नाशिक येथे घेण्यात आली त्यानुसार खालील प्रमाणे तालुक्यांना रिक्त पदांच्या ५०% केंद्रप्रमुख पदोन्नतीने भरण्यात आले.

शिक्षण विभागांतर्गत एकुण ९५ पदे पदोन्नतीने भरण्यात आली. सदर पदोन्नती करता मा.श्रीमती. आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली ९ वर्षा पासुन प्रलंबित असलेली केंद्रप्रमुख पदोन्नती करीता श्री. रवींद्र परदेशी, उप. मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री.डॉ. नितिन बच्छाव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. भास्कर कनोज उप. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. रविंद्र आंधळे, स.प्र.अ श्री. अनिल दराडे क.प्र.अ. श्री. सलीम पटेल, वरिष्ठ सहा. श्री. सुनिल सोनवणे कनिष्ठ सहा. यांनी विशेष परिश्रम घेतले.

अशी झाली पदस्थापना – १. बागलाण – ९

२. चांदवड- ६

३. सुरगाणा – ६

४. देवळा – ३

५. कळवण – ६

६. दिंडोरी – ६

७. मालेगांव -९

८. इगतपुरी – ७

९. नाशिक – ३

१०. येवला – ९

११. सिन्नर – ८

१२. पेठ – २

१३. निफाड – १०

१४. नांदगांव – ६

१५ त्रंबकेश्वर -५

COMMENTS