जोधपूर : राजस्थानमधील बाडमेर - जोधपूर हायवेवर भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये 12 लोकांचा होरपळून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार भरधाव टँकर ब
जोधपूर : राजस्थानमधील बाडमेर – जोधपूर हायवेवर भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये 12 लोकांचा होरपळून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार भरधाव टँकर बसला समोरून धडकले, या अपघातानंतर बसला आग लागली. या आगीत होरपळून 12 लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
या भीषण अपघातानंतर बाडमेर-जोधपूर महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली. बस बालोत्रा येथून सकाळी 9.55 वाजता निघाली आणि चुकीच्या बाजूने येणार्या टँकरने बसला धडक दिल्याने हा अपघात झाला. टँकरची बसला धडक झाल्यानंतर बसला आग लागली. या बसमध्ये 25 प्रवासी होते, प्रशासनाला दहा जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मोठ्यासंख्येने पोलीस दल देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. या भीषण अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. राजस्थानमधील बाडमेर-जोधपूर महामार्गावर बस आणि टँकरच्या धडकेने लोकांना आपला जीव गमवावा लागला हे दुःखद आहे. या दु:खाच्या प्रसंगी, मी शोकाकुल कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. तसेच, अपघातामधील जखमी लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. तसेच, या अपघातामधील मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये दिले जातील. तसेच, जखमींनी प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत देखील केली जाणार आहे.
COMMENTS