’जीएसटी’मधून मिळाला रेकॉर्डब्रेक महसूल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’जीएसटी’मधून मिळाला रेकॉर्डब्रेक महसूल

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटात भारतीय अर्थव्यवस्थेला लागलेली घरघर, त्यातच विविध संकटातून भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर येत असल्याचे दिसून येत आहे

ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीचा प्रवास महागणार
टीईटी घोटाळा : 25 किलो चांदी आणि दोन किलो सोने जप्त
खासगी रुग्णालयांचा असहकार ; कोरोनाबाधितांसाठी खाटा उपलब्ध करून देण्यास नकार

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटात भारतीय अर्थव्यवस्थेला लागलेली घरघर, त्यातच विविध संकटातून भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर येत असल्याचे दिसून येत आहे. जुलै महिन्यात जीएसटी संकलनात विक्रमी वाढ नोंदवण्यात आली आहे. जुलै महिन्यात जीएसटीमधून 1,16,393 कोटींचा विक्रमी महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कर संकलनात 33 टक्के वाढ झाली आहे. या आकडेवारीने केंद्र सरकारला दिलासा मिळाला आहे.
यात राज्याची कर रक्कम 28 हजार 541 कोटी आणि केंद्राचा वाटा 22 हजार 197 कोटी आहे. तर एकीकृत जीएसटी 57 हजार 864 कोटी आहे. एकीकृत जीएसटीत 27 हजार 900 कोटी आयातीच्या माध्यमातून आले आहेत. तर उपकर 7 हजार 790 कोटी जमा झाला आहे. 815 कोटी आयतीवरील उपकरातून मिळाला आहे. जीएसटीची रक्कम 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान जीएसटीआर-3 बी च्या माध्यमातून जमा झाला आहे.
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे अचानक संकट उभे राहिल्याने अनेक राज्यांनी मे आणि जून महिन्यात लॉकडाउन लागू केला होता. त्याचा परिणाम कर संकलनावर दिसून आला. जून महिन्यात जीएसटीतून सरकारला 92,849 कोटींचा महसूल मिळाला होता. मे महिन्यापाठोपाठ जूनमध्ये कर महसूल कमी झाल्याने सरकारची चिंता वाढली होती. मे महिन्यात 1.02 लाख कोटींचा कर मिळाला होता. अर्थ मंत्रालयाने आज रविवारी जीएसटीची आकडेवारी जाहीर केली. जुलै महिन्यात जीएसटीमधून 1,16,393 कोटींचा महसूल मिळाला आहे. यात सीजीएसटी 22,197 कोटी, एसजीएसटी 28,541 कोटी आणि आयजीएसटी 57,864 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर वसूली झालेल्या 27,900 कोटी रुपयांसह) आणि उपकर 7910 कोटी रुपये (वस्तुंच्या आयातीवर वसूली झालेल्या 815 कोटी रुपयांसह) यांचा समावेश आहे. जीएसटी महसूल सलग आठ महीने एक लाख कोटी रुपयांवर राहिला होता. जून 2021 मध्ये तो 1 लाख कोटी रुपयांच्या खाली आला. मे 2021 दरम्यान बहुतांश राज्ये, केंद्र शासित प्रदेश कोविडमुळे पूर्ण किंवा अंशत: बंद होते. मे 2021 महिन्यातील ई-वे बिल डेटा पाहिला असता एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात ई-वे बिल 30 टक्क्याहून कमी आहेत. त्याचा फटका जीएसटी संकलनाला बसला असल्याचे सरकारने म्हटले आहे. मात्र जुलै महिन्यात जीएसटी संकलन विक्रमी झाली आहे. मात्र आगामी काळात कोरोनाच्या तिसर्‍या संभाव्य लाटेचा धोका कायम असून, त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा तिसर्‍या लाटेत अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

COMMENTS