खासगी रुग्णालयांचा असहकार ; कोरोनाबाधितांसाठी खाटा उपलब्ध करून देण्यास नकार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खासगी रुग्णालयांचा असहकार ; कोरोनाबाधितांसाठी खाटा उपलब्ध करून देण्यास नकार

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे महापालिकेत पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

पत्नीसह 2 मुलींची गोळ्या घालून हत्या
जिल्ह्यात आता पर्यटन दुपारपर्यंतच ;  वनव्यवस्थापन 
राज्यात फुटबॉल खेळाच्या विकासासाठी जर्मनीतील ‘बुंदेसलिगा’ लीग सोबत महत्त्वाचा सामंजस्य करार

पुणे/प्रतिनिधी : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे महापालिकेत पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पुणे महापालिकेतील पाच कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे, तर दुसरीकडे पुण्यातील खासगी रुग्णालयांनी नॉन कोव्हिड बेड कोरोना रुग्णांसाठी देण्यास नकार दिला आहे. पुणे महापालिकेत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. 

पुणे महापालिकेच्या पाच कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्याशिवाय महापालिकेच्या महिला कर्मचार्‍याला दुसर्‍यांदा कोरोनाची बाधा झाली आहे. पुण्यात कोरोना सर्वेक्षण करत असताना हा संसर्ग झाला असल्याचे बोलले जात आहे. पुणे महापालिकेत आतापर्यत तब्बल 669 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे.एकीकडे पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे पुण्यातील खासगी रुग्णालयांनी नॉन कोव्हिड बेड कोरोना रुग्णांसाठी देण्यास नकार दिला आहे. पुणे महापालिका प्रशासनाची खासगी रुग्णालय चालकांसोबत बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान खासगी रुग्णालयातील 50 टक्के बेड हे राखीव ठेवावेत असे आदेश दिले आहेत; मात्र रुग्णालयांनी हे आदेश पाळण्यास नकार दिला आहे; मात्र दोन दिवसात बेडची व्यवस्था करा, अन्यथा सक्तीने ताब्यात घेऊ, अशी तंबी महापालिकेने दिली आहे. जर 50 टक्के बेड दिले नाहीत, तर 80 टक्के बेड राखीव ठेवण्याचे धोरण आखावे लागेल, असा इशाराही महापालिकेने दिला आहे. पुणे शहरातील शासकीय हॉस्पिटलमधील बेड फुल्ल झाल्याने महापालिका अ‍ॅक्शन मोडवर आली आहे. येत्या दोन दिवसांत पुणे शहरातील खासगी हॉस्पिटलमधील 50 टक्के बेड पालिका ताब्यात घेणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली आहे.

COMMENTS