Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय विद्यालय उभारण्यासाठी प्रयत्न करू – मंत्री गिरीश महाजन 

जळगाव प्रतिनिधी - जामनेर येथील प्रकाश जैन फार्मसी महाविद्यालयात स्नेहसंमेलन कार्यक्रमा मध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री यांनी विविध वि

फलटण येथील बांधकाम व्यावसायिकावर खूनी हल्ला; राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह अन्य एकावर गुन्हा
आठ महिन्‍याच्‍या बाळाचे अपहरण करत अडीच लाखात सौदा
23 वर्षांच्या तरुणाचा किक बॉक्सिंग सामन्यादरम्यान मृत्यू !

जळगाव प्रतिनिधी – जामनेर येथील प्रकाश जैन फार्मसी महाविद्यालयात स्नेहसंमेलन कार्यक्रमा मध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री यांनी विविध विषयावर आपले मत मांडले आहे.Mराज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याचे स्वप्न असून त्यासाठी आपण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी प्रयत्न करू अशी माहिती दिली. मी नेहमी संकटांना सामोरो गेल्यामुळे माझं नाव संकट मोर्चा आहे.  कारण कोणताही मोर्चा असो मी सामोरे जाऊन समस्या सोडवल्या आहेत. महाविद्यालय जीवनात जिद्द ठेवली व मतदारसंघात तळागाळातील माणसासाठी अहोरात्र झटून गेल्या 30 वर्षांपासून सेवा दिल्यामुळे आज मी सहा वेळा आमदार होऊ शकलो आहे. विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहून आपल्या आई – वडिलांच्या परिश्रमाचा भान ठेवून जिद्दीने अभ्यास करा आयुष्यात यशस्वी व्हाल. मी मतदार संघातील गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षणाची जबाबदारी घेतली एखादा गरीब आहे मात्र त्याला शिक्षण घेता येत अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करतो. त्याचबरोबर प्रत्येक रुग्णाला विविध आजारांवर शस्त्रक्रिया व उपचार करून घरी आणून ठेवण्याची जबाबदारी मी घेतली आहे. ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी आपला महाविद्यालय जीवन ते राजकीय प्रवासाला सांगितला. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत संस्कार शिकले पाहिजे. कारण , मोठे झाल्यानंतर आपण आपल्या आई – वडिलांना वाऱ्यावर सोडतो त्यांना सांभाळा असे आवाहन यावेळी विद्यार्थ्यांना केले. अशी प्रतिक्रिया कार्यक्रमात बोलताना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

COMMENTS