जिल्हाधिकाऱ्यांचे धडक कारवाईमुळे पाथर्डीतील सहा दुकानाला लागले सील

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हाधिकाऱ्यांचे धडक कारवाईमुळे पाथर्डीतील सहा दुकानाला लागले सील

अहमदनगर/प्रतिनिधी- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. यातच सण उत्सवाचा काळ सुरु असल्याने गर्दीच्या अनुषंगाने कोरोनाचा प्रादुर्भाव व

Ahmednagar : सावेडीत चक्क रिक्षातून आली मिस इंडिया उपविजेती मान्या सिंह (Video)
Sangamner : प्रत्येक नागरिकाने कोविड लस घ्यावी
पाण्यासाठी आयुक्तांच्या दालनात नागरिकांसह नगरसेवकांचा ठिय्या आंदोलन

अहमदनगर/प्रतिनिधी-

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. यातच सण उत्सवाचा काळ सुरु असल्याने गर्दीच्या अनुषंगाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.यामुळे प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले आहे. यातच नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांनी पाथर्डी तालुक्यात भेट देत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काही दुकानावर कारवाई केली आहे.

या दुकानांवर कारवाईचा बडगा… अजंठा चौकातील व्दारका मेडिकल चंदन मेडिकल पटवा किराणा उपजिल्हा रुग्णालय समोरील रविराज भोजनालय जगदंबा सलून तारकेश्वर कृषी सेवा केंद्र या सहा दुकानांमध्ये करोना नियम पाळण्यात न आल्याने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी धडक कारवाई करत दुकाने सील करण्याचे आदेश पाथर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांना दिले.

दरम्यान ही दुकाने 7 दिवसांसाठी सिल करण्याची कारवाई केली. या कारवाईमुळे शहरातील व्यापार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे मोहटादेवी गडावर बैठकीसाठी जात असताना पाथर्डी शहरात त्यांना काही दुकानांत करोना नियमांची पायमल्ली होत असल्याचे निदर्शनास आले. स्वतःया अधिकार्‍यांनी रस्त्यावर उतरुन दुकानांची पाहणी केली त्यानंतर हि कारवाई करण्यात आली आहे.

COMMENTS