कोरोना विरुद्ध युद्ध सुरूच, शस्त्र खाली ठेऊ नका : पंतप्रधान मोदी

Homeताज्या बातम्यादेश

कोरोना विरुद्ध युद्ध सुरूच, शस्त्र खाली ठेऊ नका : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली: देशातील शंभर कोटी नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा डोस मिळणे हे मोठे यश आहे. परंतु, कोरोना विरोधातील युद्ध संपलेले नसून नागरिकांनी श

कोरोना लसीकरणासाठी सक्ती नको | DAINIK LOKMNTHAN
जितेंद्र आव्हाडांच्या जीवाला धोका
ज्योती पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद – पोलिस निरीक्षक देसले

नवी दिल्ली: देशातील शंभर कोटी नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा डोस मिळणे हे मोठे यश आहे. परंतु, कोरोना विरोधातील युद्ध संपलेले नसून नागरिकांनी शस्त्र खाली ठेऊ नये असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. देशात लसीकरणाने 100 कोटींचा टप्पा ओलांडल्याच्या पार्श्‍वभूमीवर देशवासियांना संबोधित करताना ते बोलत होते.
याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की, कोरोना विरोधातील युद्धात शिथीलता येऊ देऊ नका. अंगात कितीही चांगले आणि आधुनिक चिलखत असले तरी, युद्ध चालू असतानाही शस्त्रे फेकली जात नाहीत. मी विनंती करतो की आपण आपले सण अत्यंत काळजीपूर्वक साजरे केले पाहिजेत. देशाला मोठी ध्येये कशी ठरवायची आणि ती कशी साध्य करायची हे माहित आहे. पण, यासाठी आपण सतत सावधगिरी बाळगली पाहिजे. आपण निष्काळजी राहू नये असे आवाहन पंतप्रधानांनी केले. करोना विषाणूविरूद्धच्या युद्धात केवळ 9 महिन्यांत 100 कोटी लसीचे डोस हे केवळ आकडे नाहीत. हे देशाच्या सामर्थ्याचे प्रतिबिंब आहे. इतिहासाचा नवा अध्याय तयार होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पंतप्रधानांनी कृतं मे दक्षिणे हस्ते जयो मे सव्य आहितः हा श्‍लोक म्हणत लसीकरणाबाबतची कर्तव्यपूर्ती आणि यशप्राप्ती अधोरेखीत केली. काल 21 ऑक्टोबर रोजी 100 कोटींच्या लसींच्या डोसचे कठिण पण विलक्षण लक्ष प्राप्त केले आहे. यामागे देशातील 130 कोटी नागरिकांची शक्ती आहे. यामुळे हे यश भारताचे आहे. मी यासाठी सगळ्यांचे अभिनंदन करतो असे मोदी यांनी सांगितले.
शंभर कोटी लसीचे डोस हे केवळ आकडे नाहीत. हे देशाच्या सामर्थ्याचे प्रतिबिंब आहे. इतिहासाचा नवा अध्याय तयार होत आहे. हे एक नवीन भारताचे चित्र आहे, जे कठीण ध्येय निश्‍चित करण्यासाठी आणि ते साध्य करण्यासाठी ओळखले जाते. हे भारताचे चित्र आहे जे त्याच्या कर्तृत्वासाठी कठोर परिश्रम करते. आज अनेक लोक भारताच्या लसीकरणाची तुलना जगातील इतर देशांशी करत आहेत. ज्या वेगाने भारताने 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे त्याचेही कौतुक केले जात आहे.


व्हीआयपी संस्कृतीचा अंतर्भाव नाही
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात व्हीआयपी संस्कृती लसीकरण संस्कृतीवर वर्चस्व गाजवू नये याची खात्री करण्यात आली. प्रत्येकाला सामान्य माणसाप्रमाणे लसीकरण झाले. जगातील अनेक देशांमध्ये लसीचा संकोच ही एक मोठी समस्या बनली आहे. त्याच वेळी, 100 कोटी लसीचे डोस देऊन, भारताने त्या लोकांना उत्तर दिले जे प्रश्‍न उपस्थित करत होते की भारतातील लसीबद्दलचा संकोच कसा दूर होईल असे मोदी म्हणाले. भारतासाठी, भारतातील लोकांसाठी असेही म्हटले जात होते की, इतका संयम, इतकी शिस्त येथे कशी चालेल ? पण आपल्यासाठी लोकशाही म्हणजे सबका साथ असल्याचे मोदी म्हणाले.

COMMENTS