जरंडेश्‍वरमध्ये भ्रष्टाचार नाही – अजित पवार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जरंडेश्‍वरमध्ये भ्रष्टाचार नाही – अजित पवार

पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबियांवर आयकर विभागाने छापे टाकल्यानंतर देखील भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पवार आणि त्यांच्या कुटुंबियांव

विधानसभेत तुफान राडा; भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी होणार? अजित पवार म्हणाले…
पाहुणे अजून घरी आहेत, ते गेल्यावर बोलेन… अजित पवारांची प्रतिक्रिया (Video)

पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबियांवर आयकर विभागाने छापे टाकल्यानंतर देखील भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पवार आणि त्यांच्या कुटुंबियांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यावर अखेर अजित पवारांनी मौन सोडले असून, त्यांना उत्तर दिले आहे. जरंडेश्‍वर प्रकरणावरून होत असलेले आरोप आणि चर्चांचा आता अतिरेक झाल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.
या गोष्टीला 12-15 वर्ष झाली असतील. मी म्हटले कशाला आपण त्याला उत्तर द्यायचे. पण त्याचा आता पार अतिरेक झाला. 25 हजार कोटी, 10 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. मागच्या सरकारने सीआयडीची चौकशी केली, एसीबीने चौकशी केली, इओडब्ल्यूने चौकशी केली. सहकार विभागाने न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या माध्यमातून चौकशी केली. त्यात कुणाला काही गैरप्रकार आढळला नाही, असे अजित पवारांनी यावेळी सांगितले. या सर्व प्रकरणावर अखेर अजित पवारांनी मौन सोडलं असून तब्बल 64 सहकारी साखर कारखाने आणि एका सूत गिरणीची यादीच त्यांनी समोर ठेवली आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जरंडेश्‍वर साखर कारखान्याविषयी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावत या 65 व्यवहारांविषयी कुणीच काहीच का बोलत नाही, असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
यावेळी अजित पवारांनी एकूण 64 सहकारी साखर कारखाने आणि एक सूत गिरणी अशा 65 व्यवहारांची यादीच वाचून दाखवली. गेल्या काही वर्षांमध्ये या सर्व कारखान्यांचे व्यवहार झाल्याचं ते म्हणाले. नेमक्या किती किंमतीला कोणता कारखाना कुणी विकत घेतला, याची सविस्तर माहिती यावेळी बोलताना अजित पवारांनी दिली. मागे लोक म्हणायचे की हे कारखाने मातीमोल किंमतीला विकले जातात. पण हे व्यवहार पाहाता कोट्यवधींच्या किमतीलाच कारखाने विकले जात आहेत, असं देखील त्यांनी नमूद केलं.

किमी किंमतीला विकलेल्या कारखान्याबद्दल कुणीच काही बोलत नाही
अजित पवारांनी सादर केलेल्या यादीमध्ये देखील जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचा उल्लेख आहे. राज्य सहकारी बँकेने एकूण 30 कारखाने विकले, 6 कारखाने जिल्हा बँकेने विकले. शासनमान्यतेने विक्री केलेल्या 6 कारखान्यांमध्ये 2003 साली शेतकरी सहकारी साखर काखाना 3 कोटी 36 लाखांना विकला गेला. जिल्हाधिकार्‍यांनी शासनमान्यतेनं विक्री केली. इतक्या कमी किमतीला झालेल्या व्यवहारांची कुणी चर्चाही करत नाही, कुणी बोलतही नाही, अशा शब्दांत पवारांनी आपली नाराजी बोलून दाखवली.

र्वोच्च न्यायालयाने तीन-चार वेळा याचिका फेटाळल्या
जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखान्याविषयी बोलताना अजित पवारांनी सर्वोच्च न्यायालयाने कारखान्याकडून दाखल करण्यात आलेली रीट याचिका तीन ते चार वेळा फेटाळून लावल्याची माहिती दिली. त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसारच राज्य सहकारी बँकेने कारखान्यावर जप्तीची कारवाई केली, पण हे कुणी लक्षातच घेत नाही. ज्यांच्यामुळे कारखान्याचे नुकसान झाले, तेच अशा पद्धतीने चुकीचे काहीतरी लोकांसमोर सांगत आहेत, असा दावा अजित पवारांनी यावेळी केला.


अजित पवारांच्या कंपनीकडे कारखान्याचा कारभार कसा ः सोमय्या
उपमुख्यमंत्री अजित पवार भ्रष्टाचाराचे आरोप टाळत असले तरी, ते थेट उत्तर टाळत असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. जरंडेश्‍वर विकत घेणार्‍या गुरू कमोडिटी कंपनीला अर्धे पैसे म्हणजे 32 कोटी रुपये अजित पवार यांच्या स्पार्कलिंग सॉईल आणि ग्रुप कंपनीने दिले. गेली 10 वर्ष हा कारखाना जरंडेश्‍वर शुगर कारखाना प्रायव्हेट लिमीटेड कंपनी चालवीत आहे. त्याचे मालक अजित पवार, त्यांच्या 2 बहिणी आणि सुनेत्रा अजित पवार असल्याचा दावा सोमय्या यांनी केला.

COMMENTS