मुंबईतील खासगी रुग्णालयांनी महापालिकेकडे 20 लाख लसींची मागणी नोंदवली आहे. महापालिका ही यादी राज्य सरकारकडे सोपवेल.
मुंबई/प्रतिनिधी: मुंबईतील खासगी रुग्णालयांनी महापालिकेकडे 20 लाख लसींची मागणी नोंदवली आहे. महापालिका ही यादी राज्य सरकारकडे सोपवेल. राज्य सरकार मुंबईसह महाराष्ट्रातील अन्य रुग्णालयांकडून लसींची किती मागणी झाली, ती संख्या एकत्रित करून केंद्र सरकारकडे मागणी नोंदविणार आहे.
पुढच्या येणार्या महिन्यांमध्ये खासगी क्षेत्राकडून लसींची किती मागणी होते, त्याचा अंदाज बांधण्यासाठी ही प्राथमिक स्वरुपाची यादी आहे. येत्या 21 जूनपासून नव्या धोरणानुसार, लस खरेदीला सुरुवात होईल. केंद्र सरकार देशात बनवलेले लसीचे 75 टक्के डोस खरेदी करेल. त्यानंतर केंद्राच्या देखरेखीखाली खासगी क्षेत्राला उर्वरित 25 टक्के स्टॉक विकत घेता येईल. 5 हजार ते 1.75 लाखाच्या रेंजमध्ये हॉस्पिटल्सनी कोरोना प्रतिबंधक लसींच्या डोसेसची मागणी केली आहे. काही रुग्णालयांनी एक लाखापर्यंत तर काही रुग्णालयांनी 10 ते 30 हजारपर्यंत लस पुरवठ्याची मागणी केली आहे. वोकहार्ट, नानावटी, सुराना ग्रुप, वेलस्प्रिंग हेल्थकेयर, ऑस्कर हॉस्पिटल यांनी एक ते दोन लाख लसींच्या डोसची मागणी केली आहे. बॉम्बे हॉस्पिटल, सैफी, कोहीनूर, सुश्रूत, प्रिन्स अली खान, मसिना या रुग्णालयांनी 10 ते 75 हजारपर्यंत लसीच्या डोसची मागणी केली आहे. कोव्हिशिल्डच्या लसीला मोठी मागणी आहे. अंदाजित 16 ते 17 लाख डोस मागितले आहेत. 88 खासगी नोंदणीकृत सेंटर्सपैकी 50 केंद्रांनी आपली मागणी नोंदवली आहे.
COMMENTS