कोरोनामुळे मृत्यू झाल्यास आता मिळणार ‘असा’ दाखला…

Homeताज्या बातम्यादेश

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास आता मिळणार ‘असा’ दाखला…

प्रतिनिधी : दिल्लीन्यायालयाने केंद्र सरकारला सुनावल्यानंतर आता केंद्र सरकार आणि ICMR यांनी संयुक्तपणे करोनासंदर्भातल्या मृत्यूंना देण्यासाठीच्या प्रम

राहुरी तालुक्यात पावसासाठी साकडे
चंदगड येथील फाटकवाडी धरणाला गळती (Video)
पाहुणे अजून घरी आहेत, ते गेल्यावर बोलेन… अजित पवारांची प्रतिक्रिया (Video)

प्रतिनिधी : दिल्ली
न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावल्यानंतर आता केंद्र सरकार आणि ICMR यांनी संयुक्तपणे करोनासंदर्भातल्या मृत्यूंना देण्यासाठीच्या प्रमाणपत्राविषयी सुधारित नियमावली जारी केली आहे.

केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार, आरटीपीसीआर, मोलेक्युलर टेस्ट, रॅपिड अँटिजेन टेस्ट किंवा रुग्णालय वा आरोग्य सुविधा केंद्रामार्फत करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये लागण झाल्याचं स्पष्ट झालेलेचे रुग्ण करोना बाधित म्हणून मानण्यात येतील.

ICMR च्या अभ्यास निष्कर्षांनुसार करोनाची लागण झाल्यानंतर २५ दिवसांपर्यंत व्यक्तीचा त्या बाधेमुळे मृत्यू होऊ शकतो. मात्र, केंद्रानं करोनाची लागण झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत जर व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तो करोना मृत्यू मानण्याचं जाहीर केलं आहे.

करोनाची लागण झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत रुग्णाचा हॉस्पिटल वा हॉस्पिटल बाहेर एखाद्या रुग्णसुविधा केंद्रात जरी मृत्यू ओढवला, तरी तो कोविड मृत्यूच मानला जाईल.

करोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयातच उपचारांदरम्यान होणारे किंवा घरी मृत्यू झाल्यानंतर त्यांना देण्यात आलेल्या करोना मृत्यूच्या वैद्यकीय प्रमाणपत्रावरून देखील संबंधित मृत्यू कोविड मृत्यू मानला जाईल.

विषबाधा, आत्महत्या, अपघात यामुळे घडणाऱ्या मृत्यूंना कोविड मृत्यू मानले जाणार नाही. अशा मृत्यूंमध्ये जरी करोनाची लागण असेल, तरी त्यांना कोविड मृत्यू मानले जाणार नाही.

COMMENTS