कोरोनाची दुसरी लाट किती काळ टिकणार? ; तज्ज्ञांत एकवाक्यता नाही; 15 दिवसांपासून तीन महिन्यांचा वेळ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनाची दुसरी लाट किती काळ टिकणार? ; तज्ज्ञांत एकवाक्यता नाही; 15 दिवसांपासून तीन महिन्यांचा वेळ

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची देशात दहशत पसरली आहे. आता देशात दररोज सव्वा दोन लाख रुग्ण आढळत असून मृतांचे प्रमाणही वाढत आहेत.

चालकाला चक्कर आली व जीप खड्ड्यात गेली ; अपघातात दोन महिलासह तीन जखमी
नवीन नवरदेव बाशिंग बांधून तयार
पढेगाव ग्रामसभेत मांडला प्रशासनाच्या उणिवांचा लेखाजोखा

मुंबई / प्रतिनिधी: कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची देशात दहशत पसरली आहे. आता देशात दररोज सव्वा दोन लाख रुग्ण आढळत असून मृतांचे प्रमाणही वाढत आहेत. या पार्श्‍वभूमाीवर सध्या लागू केलेली टाळेबंदी फारशी परिणामकारक नाही, असे तज्ज्ञांचे मत असून ही लाट किती दिवस टिकेल, यावरून तज्ज्ञांत मतभेद आहे. नियम पाळले, तर ही लाट अवघ्या दहा दिवसांत आटोक्यात येऊ शकते, असा दावा जसा केला जात आहे, तसेच ही लाट शंभर दिवस आटोक्यात येणार नाही, असेही काही जण सांगत आहेत. 

महाराष्ट्रात कोरोनाची आलेली दुसरी लाट अवघ्या दहा दिवसांतदेखील आपल्याला रोखता येऊ शकेल. असे मत साथरोग अभ्यासक डॉ. रमण गंगाखेडकर यांनी व्यक्त केले आहे. अर्थात त्यासाठी लोकांनी त्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागायला हवे. आजपासून सर्वांनी कोरोनाबाबत काटेकोरपणे शिस्त पाळणे ठरवले तर मग कुणाला लस मिळालेली असो किंवा नसो; तरीही कोरोनाची लाट रोखता येऊ शकते. 95 टक्के जरी लोकांनी कोरोनाची शिस्त पाळली, तरीही दहा दिवसांत दुसरी लाट रोखता येऊ शकेल.’ असे मत डॉ. गंगाखेडकर यांनी व्यक्त केले. आपल्याकडे आरोग्याची काळजी घेणारे लोक मर्यादित आहेत. वाढती रुग्ण संख्या ही काळजीची बाब आहेच; पण फक्त आकडेवाढीला आपण फार महत्त्व देऊ नये. देशातील कोरोना रुग्णांची संख्या महिनाभरापासून झपाट्याने वाढत आहे.  गेल्या वर्षी देशात कोरोनाची पहिली लाट आली, त्या वेळी सप्टेंबरच्या मध्यावर कोरोना बाधितांचा आकडा एक लाखांच्या जवळ गेलेला नव्हता; मात्र आता एप्रिल महिन्यात आलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनी सगळेच विक्रम मोडीत काढले. राज्याच्या कोविड टास्कचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी, आपण कोरोना रुग्णवाढीच्या शिखराच्या जवळ पोहोचलो आहोत. पुढच्या आठवड्यात कोरोनाची लाट ओसरू लागेल. दररोज आढळून येणार्‍या कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण कमी होऊ लागेल, असा आशेचा सूर लावला. 

काही तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची ही दुसरी लाट शंभर दिवसांपर्यंत टिकू शकते. ते म्हणाले, की 70 टक्के लोक लस घेत नाहीत आणि लोकांची सामूहिक रोग प्रतिकारशक्ती वाढत नाही, तोपर्यंत कोरोनाच्या या लाटा येतच राहतील. सामूहिक रोग प्रतिकारशक्ती हे संसर्गजन्य रोगांविरूद्ध अप्रत्यक्ष संरक्षण आहे. या सामूहिक प्रतिकारशक्तीला हर्ड इम्यूनिटी म्हणतात. देशात कोरोना विषाणूचा साथीचा प्रादुर्भाव (कोविड सेकंड वेव्ह) वाढत आहे. आता संसर्गाच्या नवीन घटनांची संख्या रोज दोन लाखांहून अधिक झाली आहे. या वर्षी प्रथमच कोरोनामुळे होणार्‍या दैनंदिन मृत्यूची संख्याही हजारांच्या पुढे गेली आहे. दरम्यान, एका विषाणूविज्ञानाच्या मते, कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेतून एवढ्यात सुटका नाही. विषाणूविशेषज्ञ डॉ. शाहिद जमील यांचे म्हणणे आहे, की कोरोनाची दुसरी लाट मेअखेरपर्यंत टिकू शकते आणि नवीन संक्रमणाची संख्या दररोज तीन लाखांपर्यंत पोहोचू शकते. नवीन प्रकरणांची संख्या वाढण्याची गती खरोखर भयावह आहे. जर आपण सक्रिय रुग्णसंख्या वाढीकडे लक्ष दिले तर ती दररोज सुमारे सात टक्के वेगाने वाढत आहे. ही टक्केवारी खूप जास्त आहे. जर हा वेग कायम राहिला, तर लवकरच देशांत दररोज तीन लाख रुग्ण सापडू शकतात. 

लसीची कमतरता नाही

भारतामध्ये कोरोना लस नाही, हे म्हणणे जमील यांना मान्य नाही. एकटी सीरम इन्स्टिट्यूट केवळ एका महिन्यात 5 ते 6 कोटी डोस उत्पादन करू शकते. त्याचप्रमाणे भारत बायोटेक दोन ते तीन कोटी डोसदेखील देऊ शकते. भारताच्या या दोन कंपन्यांनी आतापर्यंत 31 ते 32 कोटी डोस तयार केले आहेत. त्यापैकी आतापर्यंत भारतात सुमारे 12 कोटी डोस वापरण्यात आले आहेत आणि सुमारे 65 लाख डोस पाठविण्यात आले आहेत. या अनुषंगाने भारताकडे अजूनही 10 कोटी डोस शिल्लक राहिले पाहिजेत. म्हणून, लसीची कमतरता नाही. 

COMMENTS