‘कृष्णा’ च्या निवडणूकीच्या पहिल्या फेरीत सहकार पॅनेलचे सर्व उमेदवार 5 हजाराने आघाडीवर; कार्यकर्त्यांकडून जल्लोश; जेसीबीद्वारे गुलालाची उधळण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘कृष्णा’ च्या निवडणूकीच्या पहिल्या फेरीत सहकार पॅनेलचे सर्व उमेदवार 5 हजाराने आघाडीवर; कार्यकर्त्यांकडून जल्लोश; जेसीबीद्वारे गुलालाची उधळण

कराड / प्रतिनिधी : सातारा-सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीच्या तिरंगी लढतीच्य

महायुती सरकारला शेतकर्‍यांचा विसर
खंडणी मागणार्‍याविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करा ; व्यावसायिकांची मागणी
भविष्याचा नवा कर्तव्यपथ

कराड / प्रतिनिधी : सातारा-सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीच्या तिरंगी लढतीच्या पहिल्या फेरीचे निकाल नुकतेच जाहिर झाले. या मध्ये डॉ. सुरेश भोसले यांच्या जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे सर्व उमेदवार 5 हजाराच्या आघाडीवर असल्याचे जाहीर होताच परिसरातील कार्यकर्त्यांनी जल्लोश केला. यानिमित्त जेसीबीच्या सहाय्याने गुलालाची उधळण केली. तसेच कृष्णा मेडीकल कॉलेज परिसरात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोश केला. 

तिरंगी लढत होत असल्यामुळे तिन्ही पॅनेल प्रमुखांवर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता. अशी बिकट परिस्थिती तसेच कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे प्रचारास येणार्‍या अडचणी यामुळे आघाडी कोणाला मिळणार? असा सवाल उपस्थित होत होता. कारखान्याचे विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी चेअरमन अविनाश मोहिते व डॉ. इंद्रजित मोहिते हे पॅनेलचे प्रमुख होते. प्रत्येकाच्या आघाड्या तसेच पॅनेलच्या माध्यमातून कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र पिंजून काढले होते. त्यामुळे कृष्णाच्या चाव्या कोणाच्या हातात जाणार याकडे सातारा-सांगली जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील सहकार चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्यांच्या नजरा एकवटल्या होत्या. सकाळी सुरु झालेली पहिली फेरी संपल्यानंतर मतमोजणी केंद्रातून आघाडीवर असलेल्या उमेदवारांची नावे जाहिर करण्यात आली. त्यामध्ये जयवंतराव भोसले सहकार पॅनेल उमेदवार यादी पुढीलप्रमाणे- गट क्र. 1 वडगाव हवेली – दुशेरे – धोंडिराम शंकरराव जाधव (दुशेरे), जगदीश दिनकरराव जगताप (वडगाव हवेली), सयाजी रतन यादव (येरवळे), गट क्र. 2 कार्वे – काले- दयाराम भीमराव पाटील (काले), गुणवंतराव यशवंतराव पाटील (आटके), निवासराव लक्ष्मण थोरात (कार्वे), गट क्र. 3 नेर्ले – तांबवे दत्तात्रय हणमंत देसाई (वाठार), लिंबाजी महिपतराव पाटील (तांबवे), संभाजीराव आनंदराव पाटील (नेर्ले), गट क्र. 4 रेठरे हरणाक्ष – बोरगाव- जयवंत दत्तात्रय मोरे (रेठरे हरणाक्ष), जितेंद्र लक्ष्मणराव पाटील (बोरगाव), संजय राजाराम पाटील (इस्लामपूर), गट क्र. 5 येडेमच्छिंद्र – वांगी – शिवाजी बाबूराव पाटील (येडेमच्छिंद्र), बाबासो खाशाबा शिंदे (देवराष्ट्रे), गट क्र. 6 रेठरे बुद्रुक – शेणोली- डॉ. सुरेश जयवंतराव भोसले (रेठरे बुद्रुक), बाजीराव दाजी निकम (शेरे), अनुसूचित जाती / जमाती – विलास ज्ञानू भंडारे (टेंभू), महिला प्रतिनिधी – इंदुमती दिनकर जाखले (नेर्ले), जयश्री माणिकराव पाटील (बहे), इतर मागासवर्गीय वसंतराव बाबुराव शिंदे (विंग), भटक्या जाती / जमाती अविनाश मधुकर खरात (खरातवाडी). हे सर्व उमेदवार 5 हजाराच्या आघाडीवर असल्याचे जाहिर करण्यात आले. सहकार पॅनेलचे उमेदवार आघाडीवर असल्याचे समजताच कृष्णाच्या कार्यक्षेत्रातील लोकांनी जल्लोष केला. 

कराड येथील कृष्णा मेडीकल कॉलेज परिसरात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या निमित्त हौंशी कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने गुलालाची उधळण करून जल्लोष केला. निवडणूकीच्या पार्श्‍वभूमिवर सातारा-सांगली जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मात्र, विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्याच पॅनेलने आघाडी घेतल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

COMMENTS