सुशोभीकरणाच्या कामामुळे वसंत सागर जलाशयाच्या सौंदर्यात भर; चांदोली धरण परिसरात सीसीटीव्ही कॅमेर्‍यासह स्ट्रीट लाईट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुशोभीकरणाच्या कामामुळे वसंत सागर जलाशयाच्या सौंदर्यात भर; चांदोली धरण परिसरात सीसीटीव्ही कॅमेर्‍यासह स्ट्रीट लाईट

शिराळा / प्रतिनिधी : सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असलेले अशिया खंडातील क्रमांक दोनचे मातीचे धरण म्हणून चांदोली धरणाचे नाव चटकन डोळ्या पुढे येते

पेन्शन मंजूर, पण ना-हरकत दाखल्यासाठी हेलपाट्यांची वेळ ; रयतच्या निवृत्त मुख्याध्यापकाचे उपोषण
घरगुती गॅसचा काळाबाजार; अनधीकृत गॅस पंपांवर दोन ठिकाणी कारवाई
विजेचा वेग, चित्याची चपळता आणि वाऱ्याचा सळसळाट !

शिराळा / प्रतिनिधी : सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असलेले अशिया खंडातील क्रमांक दोनचे मातीचे धरण म्हणून चांदोली धरणाचे नाव चटकन डोळ्या पुढे येते. सुमारे 34.40 टीएमसी पाणीसाठा असलेले व चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या तोंडाशी असलेले हे धरण निर्मिती पासूनच चर्चेत राहिले आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पाथरपुंज येथे वारणा नदी उगम पावली आहे. शिराळा, शाहुवाडी, पाटण तालुक्याच्या हद्दीत अभयारलेल्या प्रचीत गडाच्या पायथ्याशी राम नदीचा उगम आहे. या दोन नद्या धरणाच्या पाणी साठयाचे मुख्य स्त्रोत आहेत. चांदोली गावाच्या हद्दीवर असल्याने चांदोली, तर वारणा नदीवर असल्याने वारणा म्हणून हे धरण प्रसिध्द आहे. चांदोली धरण हा पाण्याचा अमूल्य ठेवा आहे. नैसर्गिक देणगी लाभलेल्या या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाळ्यात अडीच हजाराहून अधिक मिलीमीटर पाऊस पडतो.

धरणाच्या प्रवेशद्वारावर; तसेच माथ्यावर दक्षिण व उत्तरेला सुरक्षेसाठी दोन चौक्या आहेत. परवानगी घेऊनच धरण पाहण्यासाठी सोडले जाते. दुचाकी, चारचाकी घेऊन पर्यटकांना धरणाच्या सर्व भागात आरामदायी फिरता येते डोंगर, दर्या, प्रचंड पाणीसाठा, थंड हवा, शांत व नयनरम्य परिसर पाहून कोणालाही येथे मुक्कामास जणू भुरळच पाडते. त्यातच नुकतेच मध्यभागी असलेल्या चांदोली धरणाच्या वैभवात सीसीटीव्ही कॅमेरे, स्ट्रीट लाईट, गाड्यांचे पार्किंग, वारणा धरण नावाची कमान व सुशोभीकरणाच्या कामामुळे आणखीन भर पडली आहे. 34.40 टिएमसी पाणी साठवण क्षमता असलेले चांदोली धरण हे देशातील सर्वात मोठे मातीचे धरण आहे. या धरणामुळे हा परिसर वर्षाचे 12 महिने हिरवळीने नटलेला असतो. हे धरण वसंत सागर जलाशय व वारणा धरण या नावानेही ओळखले जाते. याला लागून असलेले चांदोली राष्ट्रीय उद्यान व हे चांदोली धरण पाहण्यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील विविध ठिकाणांहून प्रती वर्षी हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. 

सुशोभीकरणाच्या कामांमळे चांदोली धरणाचे रुपडे आता बदलले आहे. धरणाच्या पायथ्याला ’वारणा धरण’ नावाने सुसज्ज लोखंडी गेट बांधण्यात आले आहे. धरण पाहण्यासाठी येणार्‍या पर्यटकांच्या गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था व्हावी, या हेतूने पार्किंग शेड बांधण्यात आले आहे. खूप वर्षांपासून तेथे अस्तित्वात असलेल्या वडाच्या झाडाभोवती ज्याला पूर्वी ’पार’ म्हटले जायचे तो कट्टादेखील नव्याने बांधण्यात आला आहे. गेटला लागून बांधण्यात आलेल्या बाजूच्या भिंतींचे बांधकामही घडीव दगडांमध्ये करण्यात आले आहे.

गेटच्या आतमध्ये काही अंतरापर्यंत येण्या-जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते, त्याच्या दोन्ही बाजूला नाले व त्याला लागूनच पेविंग ब्लॉक बसविण्याचे काम सुरू आहे. दोन्ही रस्त्यांच्या मधोमध असलेला कठडा सुशोभीत करून त्यामध्ये वृक्षलागवड करण्यात आली आहे. संपूर्ण धरण परिसरातील स्ट्रीटलाईट व सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे चांदोली धरणाच्या वैभवात अधिकच भर पडली आहे.  

चौकट

चांदोली धरण पाहण्यासाठी येणार्‍या पर्यटकांना पार्किंगसारखी सुविधा व आकर्षण वाटावे. अशी सुशोभीकरणाची कामे या ठिकाणी करण्यात आली आहेत. याहीवर्षी पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीने धरण प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. 

टि. एस. धामणकर 

(वारणा प्रकल्प शाखा अभियंता )

COMMENTS