राजधानीत विरोधकांच्या जोर-बैठका

Homeताज्या बातम्यासंपादकीय

राजधानीत विरोधकांच्या जोर-बैठका

राजधानी अर्थात दिल्लीमध्ये विरोधकांच्या बैठका मोठया प्रमाणात सुरू आहेत. विविध प्रादेशिक पक्षांचे महत्वाच्या नेत्यांचा दिल्लीतील वावर चांगलाच वाढला अस

आदर्श शाळा बांधकामासाठी 494 कोटींना मंजुरी l DAINIK LOKMNTHAN
मंत्रिमंडळाचा प्रस्ताव प्रलंबित ठेवता येणार नाही ; राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयाची टिप्पणी
Raut : नारायण राणे प्रकरणात अमित शहांची एंट्री : शिवसेनाही तयारीत… संजय राऊतांना मुंबई | LOK News24

राजधानी अर्थात दिल्लीमध्ये विरोधकांच्या बैठका मोठया प्रमाणात सुरू आहेत. विविध प्रादेशिक पक्षांचे महत्वाच्या नेत्यांचा दिल्लीतील वावर चांगलाच वाढला असून, हा वावर आगामी 2024 च्या निवडणूकीचा एक भाग आहे की, तिसरी आघाडी उघडण्यासाठी सुरू असलेली रणनिती. याबाबत अद्याप काहीच स्पष्ट झाले नसले तरी मात्र विरोधकांच्या राजधानीच चांगल्याच जोर बैठका सुरू असल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय जनता पक्षाचे नेते लालुप्रसाद यादव यांनी नुकतीच समाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंह यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. तर खुद्द शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतली. तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांसोबत डिनर डिप्लोमसी करत रणनीती आखण्याचा प्रयत्न केला. या बैठकीला तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी आणि इतर अनेक प्रादेशिक पक्षांचे नेतेही उपस्थित होते. मात्र बसपा आणि आम आदमी पक्षाचे नेते गैरहजर होते. या आधी राहुल गांधींनी बोलावलेल्या कोणत्याही बैठकीला तृणमूल काँग्रेसचे नेते उपस्थित राहत नसत. मात्र, या बैठकीला त्यांनी उपस्थिती नोंदवली. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यामुळे राजधानीतील हा भेटींचा सिलसिला, हा खटाटोप नेमका कशासाठी सुरू आहे. असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. संसदेचे अधिवेशन जरी सुरू असले, तरी अशा जोर-बैठका कधी घडल्या नाहीत. महत्वाचे विधेयक असेल, अशावेळी बैठका अपवादानेच घडल्या आहेत. त्यातच राजकीय चाणक्य असेलेले प्रशांत किशोर यांच्या देखील विरोधी पक्षांच्या प्रमुखांसोबत चर्चा सुरू आहेत. किशोर नेमकी काय रणनीती आखत आहेत. नेमके ममता बॅनजी यांना तिसर्‍या आघाडीकडून पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करणार आहेत की, राहुल गांधी यांना प्रोजेक्ट करण्याचे मनसुबे आहेत.
पुढील वर्षी होत असलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीसह काँग्रेस 2024 मधील लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागली असून, पक्षाने आता नवीन व्यूहरचनेकडे लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. यातच आता प्रसिद्ध रणनीतीकार प्रशांत किशोर यांना पक्षात घेण्याबद्दल काँग्रेस सकारात्मक असून, याबद्दलचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रशांत किशोर यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचं स्थान हवं आहे. त्यासंदर्भात त्यांनी काही पर्याय काँग्रेसला सूचवले असून, आगामी काळात प्रशांत किशोर सोनिया गांधी यांचे सल्लागारपदीही दिसू शकतात. काँग्रेसमध्ये राष्ट्रीय पातळीपासून ते स्थानिक पातळीपर्यंत मोठे फेरबदल केले जाणार आहेत. याचबरोबर राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर लवकरच काँग्रेसमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे. प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका हवी आहे. त्यासाठी त्यांनी काही पर्याय पक्षश्रेष्ठीला सूचवले आहेत. राहुल गांधी त्यांची पप्पू प्रतिमा पुसण्यात यशस्वी झाले असले तरी देखील त्यांची राजकारणातील धरसोड वृत्ती, काँगे्रसला नडते. काँगे्रसला 24 तास राजकारणात सक्रिय असलेला नेता हवा आहे. मात्र 15-20 दिवस झाले की, राहुल गांधी अचानक गायब होतात. आणि पुन्हा अचानक प्रगटतात. ही धरसोडवृत्ती त्यांना टाळावी लागणार आहे. सर्वसामान्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी आपण नेहमीच उपलब्ध असलो पाहिजे. ही जाणीव राजकारणात फार महत्वाची ठरते. ममता बॅनर्जी यांचे प्रस्थ वाढू नये, आणि आपल्याला स्पर्धक होऊ नये, यासाठी राहुल गांधी यांनी आक्रमकपणे विरोधकांची मोट बांधण्यांचा प्रयत्न सुरू केला आहे. वास्तविक पाहता, उत्तरप्रदेशसह पाच राज्यात निवडणूका आगामी काळात निवडणूका आहेत. या निवडुका 2024 च्या लोकसभा निवडणुकांची नांदी ठरू शकतात. या निवडणुकांच्या निकालावरून आगामी लोकसभेच्या निवडणुकीत काय परिणाम बघायला मिळतील, याचे चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे या राज्यातील निवडणुकाबरोबरच लोकसभेच्या निवडणुकीसाठी विरोधक एकत्र येतांना दिसून येत आहे.

COMMENTS