कशी जिंकणार जाती अंताची लढाई?

Homeताज्या बातम्यासंपादकीय

कशी जिंकणार जाती अंताची लढाई?

माणूस जन्माला आला की पाठीला जात चिकटते.जन्माला आलेला जीव जसजसा वाढत जातो,तसतसा जातीचा शिक्का अधिक गडद होतो.मनावर जात कोरली जाते.दुसऱ्या जातीविषयीचा त

नगरच्या दोघांनी केली साडेनऊ कोटींची फसवणूक ;गुन्हा दाखल
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा
एस.एस.जी.एम. महाविद्यालयात गांधी विचार संस्कार परीक्षा उत्साहात

माणूस जन्माला आला की पाठीला जात चिकटते.जन्माला आलेला जीव जसजसा वाढत जातो,तसतसा जातीचा शिक्का अधिक गडद होतो.मनावर जात कोरली जाते.दुसऱ्या जातीविषयीचा तिरस्कार मनावर बिंबवला जातो.जन्मदाखल्यावर जातीच्या आधी लावलेला हिंदू शब्दाला तशीही काही किंमत उरत नाही.मी हिंदू आहे असे म्हणणारा प्रत्येक जण हिंदू शब्दाच्या पुढे लावलेली जात शोधण्यात आणि तिरस्कारात सारे आयुष्य वाया जाते.अशा या मानसिकतेत जातीय अंताची लढाई कशी जिंकता येईल.
जेंव्हापासून मला शुध्द आली म्हणजे आपण जगात जन्माला झाल्याचे भान आले तेंहापासून मी हिंदू असल्याची वारंवार जाणीव करून दिली जात असली तरी वाणी कजूंष असतो,न्हावी चतूर असतात,धर्माच्या नावावर ब्राम्हण सगळ्या जनतेला मुर्खात काढतो.यादव जमातीच्या माणसाला बुध्दी कमी असते,राजपूत,मराठा ,क्षत्रीय अत्याचारी असतात.दलीत समाजाची मंडळी गंधे असतात,जाट,गुर्जर समाज नाहक भांडणे लावतो,मारवाडी लालची असतात अशा प्रकारचे असंख्य पातळीवर अगाध ब्रम्हज्ञान सतत कानावर पडत आहे.ही अवस्था प्रत्येकाची आहे.प्रत्येकाला याच प्रक्रीयेतून जावे लागत असल्याने माणसाचे मन त्याच्या जातीच्या बाहेर पडत नाही.
जी कधीच जात नाही ती जात मरणानंतर पार पडणाऱ्या सोपस्कारातूनही डोकावते.जीवन जगत असताना अमूक एका जातीचा म्हणून एकाच धातूंनी निर्माण झालेल्या माणसाचा तिरस्कार केला जातो,गावागावात,गल्लीगल्लीत भांडणे लावली जातात.मुडदे पाडले जातात.कायद्याच्या वरवंट्याखाली खोटी कारस्थाने करून चिरडले जातात.कारण एकच.तो अमूक एका जातीचा आहे असा तिरस्कार पाचवीपासूनच पुजला जातो.परिणामी माणसाच्या मनात दुसऱ्या माणसाविषयी हिन भावना तयार होते.शेजारी राहणाऱ्या दुसऱ्या जातीच्या माणसाविषयी संशय आणि त्यातून द्वेष पसरवला जातो.त्याचीच परिणीती हजारो वर्षाची परंपरा असलेला सहिष्णू म्हणविणारा धर्म बदनाम होतो.आपआपसात लढून कमजोर बनविला जातो.हिंदू धर्माच्या एकूणच सहिष्णूतेवर जळफळाट होणाऱ्या मंडळींना जो उद्देश्य साध्य करायचा होता तो त्या मंडळींनी या मानसिकतेतून साध्य केला आहे.एकसंघ समाजाशी  लढणे शक्य नाही ही खात्री असल्यानेच पध्दतशीरपणे असा फोडा आणि झोडाचा डाव खेळला गेला.आपणही तो आपल्या कर्तृत्वाने साध्य करण्यास मदत केली आणि करीत आहोत.खरे तर धर्ममार्तंड जेंव्हा अशा प्रकारचा खेळ खेळून समाज ऐक्याशी कपट कारस्थान करीत होते तेंव्हा आपला सदविवेक जागा ठेवून या मंडळींना प्रतिप्रश्न विचारण्याचे धाडस करायला हवे होते,रजपूत,मराठा क्षत्रीय अत्याचारी होते तर त्यांनी सर्व जात समावेशक समाजाच्या रक्षणासाठी तलवार हातात घेऊन आपले रक्त का सांडले?ब्रम्हविद्येला दलीत समाज गंधा वाटत होता तर त्याच समाजातील एका विद्वानाने लिहीलेल्या वाल्मिकी रामायणाची पुजा का करता? माता सीता महर्षि वाल्मिकींच्या आश्रमात का राहील्या?कजूंष म्हणविणाऱ्या  मारवाडी,व्यापारी समाजाचे सोन्याचा धुर निघणाऱ्या भाराताच्या विकासात कुठलेच योगदान नव्हते किंवा नाही का?देशाच्या कानाकोपऱ्यात निर्माण झालेल्या शाळा,मंदीरे,रूग्णालये यांच्या उभारणीत आणि नित्य दैनंदीन उपयोजनेत व्यापारी,मारवाडी समाजाचे योगदान कसे विसरता? राष्ट्रीय गंगाजळीतील त्याचा समभाग दुर्लक्षीत करता येईल का?जाक,गुर्जर ,कुणबी मेहनती नसते,मातीत या समाजाने घाम गाळला नसता तर अन्नधान्याच्या राशी उभ्या राहिल्या असत्या का?सीमेवर लढणाऱ्या लष्कराला मनुष्यबळ कसे उपलब्ध झाले असते?असे नाना प्रश्न विचारून या मंडळींचा संकूचीत दृष्टीकोन हाणून पाडणे शक्य होते आणि आहे.या तत्वज्ञानातून मिळणारा संदेश जातीअंताच्या लढाईसाठी प्रेरक आहे.कुठलीच जात श्रेष्ठ किंवा हिन नाही.प्रत्येक जात आपआपल्या पातळीवर श्रेष्ठच आहे तिला तीचा सन्मान देऊन समाज सख्य वृध्दींगत ठेवणे देशाच्या अखंडतेसह विकासासाठी महत्वाचे आहे.
मी जेंव्हा लिहीतो वाचतो शिकवतो तेंव्हा ब्राम्हण असतो,परिवार आणि समाजाचे रक्षण करतो तेंव्हा क्षत्रीय असतो.कुटूंब उदरभरणाची सोय करतो तेंव्हा वैश्य तर जेंव्हा मी माझे घर अंगण कार्यालय स्वच्छ करण्यासाठी हातात झाडू घेतो तेंव्हा शुद्र असतो.माझ्यातच हे सारे वर्ण सामावून घेत मी एक परिपुर्ण माणूस आहे ही भावना दृढ होते,तेंव्हा समाज सख्याशी खेळण्याचे धाडस कुठलीच शक्ती करणार नाही.एक सच्चा भारतीय म्हणून आपण प्रत्येकाने वर्णव्यवस्थेच्या नावावर फुटीचे राजकारण करणाऱ्या शक्तीशी सामना केला तर जाती अंताची लढाई जिंकणे अजिबात कठिण नाही.

COMMENTS