एसटी कर्मचारी उपोषणाच्या पवित्र्यात; दिवाळीपूर्वी भत्ते व थकबाकी देण्याची मागणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसटी कर्मचारी उपोषणाच्या पवित्र्यात; दिवाळीपूर्वी भत्ते व थकबाकी देण्याची मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी - एसटी कर्मचार्‍यांना शासनाप्रमाणे भत्ते व थकबाकी दिवाळीपूर्वी दिली नाही तर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सर्व कामगार-कर्मचारी संघटना

मुख्यालयी राहण्याच्या बंधनातून जि.प. शिक्षकांना मुक्त करा
‘त्या’ समाजकंटकांवर कारवाई करावी
जुगार अड्डयावर छापा साडे सात लाखाच्या मुद्देमालासह 24 ताब्यात

अहमदनगर/प्रतिनिधी – एसटी कर्मचार्‍यांना शासनाप्रमाणे भत्ते व थकबाकी दिवाळीपूर्वी दिली नाही तर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सर्व कामगार-कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने दिला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचार्‍यांना माहे ऑक्टोबर देय नोव्हेंबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करावे तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर शासनाप्रमाणे लागू करून थकबाकीची रक्कम एक रकमी दिवाळीपूर्वी देण्यासंदर्भात एसटी प्रशासनाकडे एसटी महामंडळातील सर्व संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने दि. 27 ऑक्टोबर रोजी राज्यभर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सांगितले.
सध्या एसटी महामंडळात दुर्दैवाने एस.टी. कर्मचार्‍यांच्या आत्महत्येच्या घटना सातत्याने घडत आहेत. यामध्ये विशेषत: एस.टी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यामुळे आत्महत्या केल्याचे मृत कर्मचार्‍यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून हृदयाला चटका लावणारी आहे. एस.टी. कर्मचार्‍यांना अत्यंत कमी पगार असल्याने त्यातच अनेक विभागात लॉकडाऊन हजेरी न दिल्याने रोख वेतन (निव्वळ देय) अत्यंत कमी होणार असल्याने दीपावलीसारख्या मोठया सणामध्ये एवढया कमी पैशात सण साजरा करणे जिकरीचे ठरणार आहे, असे सांगून तिगोटे म्हणाले, कारण अनेक कर्मचार्‍यांनी मूलभूत गरजा भागविण्यासाठी कर्ज काढलेले आहे तसेच घरभाडे, राशन, आई-वडीलांचे आजारपण, मुलांचे शिक्षण, इतर कर्ज, उसनवारी अशी देणी असल्याने दिवाळी सण साजरा करणे पगारात शक्य नाही. त्यामुळे एस.टी.कर्मचार्‍यांचे वेतन व महागाई भत्ता थकबाकी, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी, घरभाडे भत्त्याची थकबाकी देणे आवश्यक असल्याचे तिगोटे यांनी सांगितले.
राज्य मार्ग परिवहन कर्मचार्‍यांना दीपावलीचा सण साजरा करण्यासाठी माहे ऑक्टोबर देय नोव्हेंबर महिन्याचे वेतन दि.1 नोव्हेंबर रोजी दिवाळीपूर्वी अदा करण्यात यावे तसेच एकतर्फी वेतनवाढ लागू करताना दि. 1 एप्रिल 2016 पासून शासनाप्रमाणे महागाई भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर 3%, घरभाडे भत्ता 8, 16, 24 % देण्याचे मान्य केले होते परंतु अद्यापपर्यंत अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे शासनाप्रमाणे भत्ते देऊन थकबाकीची रक्कम एक रकमी दीपावलीपूर्वी देण्यात यावेळी यासह विविध मागण्यांकरीता महाराष्ट्र एसटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने दि.27 ऑक्टोबर रोजी राज्यभर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील संयुक्त कृती समितीत महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक), महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, कास्ट्राईब एसटी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन यासह एकूण 17 संघटना सहभागी आहेत.

COMMENTS