Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उष्माघातामुळे 11 वर्षीय मुलाचा मृत्यू

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील 11 वर्षीय बालक साई गोरक्षनाथ मुसमाडे याचा उष्मघाताने मृत्य झाल्याची घटना रविवार 5 मे रोजी घडली

श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24
समन्यायी पाणी वाटपाचा प्रश्‍न पुन्हा उच्च न्यायालयात
संजीवनी अकॅडमीचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील 11 वर्षीय बालक साई गोरक्षनाथ मुसमाडे याचा उष्मघाताने मृत्य झाल्याची घटना रविवार 5 मे रोजी घडली आहे. वाढत्या उन्हामुळे चिमुकला साई याचा बळी गेल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे.
               तांभेरे येथील गोरक्षनाथ मुसमाडे यांचा एकुलता मुलगा साई हा ज्ञानवर्धिनी स्कुलमध्ये इयत्ता 5 वि च्या वर्गात शिक्षण घेत होता. उन्हाचा तडाखा बसल्याने साई याला उलटी व जुलाब त्रास झाला.त्यानंतर त्यास लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.वाढत्या उन्हाचा तडाखा बसल्याने साई याला त्रास होऊन मृत्यूचा सामना करावा लागला आहे. साई याच्यावर  रविवारी तांभेरे येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत साई याच्या मागे आई व वडील असा परिवार आहे.साई मुसमाडे हा मच्छीन्द्र मुसमाडे यांचा पुतण्या तर संतोष व संदीप मुसमाडे यांचा चुलत भाऊ होता.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.वाढत्या उन्हात घरा बाहेर पडतांना नागरिकांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

COMMENTS