उच्चभू्र इमारतीतील रहिवाशांच्या प्रतिकारशक्तीत वाढ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उच्चभू्र इमारतीतील रहिवाशांच्या प्रतिकारशक्तीत वाढ

कोरोनाचे सावट दिवसागणिक अधिकच गडद होत असताना मुंबईत या संसर्गातून मुक्त होणार्‍या रुग्णांचा आकडा काही अंशी दिलासा देऊन जात आहे.

डोंबिवली पोलिसांनी उत्तम कामगिरी ; अवघ्या १० मिनिटांत शोधून काढला महिलेचा फोन
रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई पाटील यांची आज पुण्यतिथी
पुणे विद्यापीठात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा पुतळा जयंतीदिनी अनावरण करण्याचे नियोजन करा : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई/प्रतिनिधीः कोरोनाचे सावट दिवसागणिक अधिकच गडद होत असताना मुंबईत या संसर्गातून मुक्त होणार्‍या रुग्णांचा आकडा काही अंशी दिलासा देऊन जात आहे. यातच आता मुंबईकरांच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत उच्चभ्रू इमारतीतील रहिवाशांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली आहे. झोपडपट्ट्यांमधील नागरिकांमध्ये याउलट चित्र पाहायला मिळत आहे. 

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत उच्चभ्रू इमारतीतील अनेक नागरिकांना या विषाणूची लागण झाल्याचे दिसत होते. त्यानंतर आता याच उच्चभ्रू इमारतींतील रहिवाशांची कोविडविरोधातील रोगप्रतिकारशक्ती वाढत आहे. याउलट चित्र झोपडपट्टी भागात दिसत आहे. झोपडपट्ट्यांमधील नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याची माहिती समोर आली आहे.तिसर्‍या सेरो सर्वेक्षणात हा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. तिसर्‍या सेरो सर्वेक्षणात 24 विभागांमधील 10 हजार 197 नागरिकांच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी झाली. त्यात 36.30 टक्के मुंबईकरांमध्ये कोरोना रोगप्रतिकारशक्ती वाढल्याचा निष्कर्ष आहे. असे असले, तरीही कोरोनाबाबतची सावधगिरी मात्र काटेकोरपणे बाळगली जाणे अपेक्षित आहे. एकिकडे मुंबईतील काही भागांत नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढलेली असतानाच दुसरीकडे शहरात नव्या कोरोनाबाधितांची नोंद होण्याचा वेग मंदावला आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत तर मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या वेगाने वाढली होती; पण आता मात्र कोरोना रुग्ण वाढीचा दर हा गेल्या पंधवड्यात निम्म्यावर आला आहे. मुंबईकरांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट ही मार्च महिन्याच्या शेवटी सुरू झाली. महाराष्ट्र राज्यातील मोठी शहरे मुंबई, पुणे, नागपूरमध्ये कोरोनाचे पुन्हा थैमान घातले. यात मुंबईची रुग्ण संख्या ही झपाट्याने वाढली. एके दिवशी तर दिवसाला11 हजारवर रुग्ण संख्या येत होती; पण आता मुंबईतील कोरोनाचा आकडा स्थिरावला आहे.

COMMENTS