Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्लास्टिकचा कचरा उघड्यावर फेकणार्‍याविरोधात कारवाई करा : पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा / प्रतिनिधी : जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, नगरपरिषदा कार्यक्षेत्रामध्ये नागरिकांकडून प्लास्टिक वापर सर्रास केला जात अस

आंतरराष्ट्रीय पॅरा टेबल टेनिस स्पर्धेत पृथ्वी बर्वेचा डबल धमाका
मोकळ्या जागेवर कर लावण्याच्या ठरावाचा तात्काळ अहवाल द्या; कराड पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना आयुक्तांचा दणका
प्रकाश संकुलाच्या कर्मचार्‍यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम मंत्री जयंत पाटील करतात : अभिजित पाटील

सातारा / प्रतिनिधी : जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, नगरपरिषदा कार्यक्षेत्रामध्ये नागरिकांकडून प्लास्टिक वापर सर्रास केला जात असल्याने जिल्ह्याचे स्वच्छतेचे सातत्य टिकवण्यासाठी गाव व तालुका स्तरावरील पथकाकडून दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिल्या.
महाराष्ट्र शासनाचा स्वच्छ भारत मिशन उपक्रम जिल्ह्यामध्ये सर्व नगरपरिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येत आहे. जिल्ह्याचे स्वच्छतेचे सातत्य राखण्यासाठी माननीय पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली स्वच्छता विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत अर्चना वाघमळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता क्रांती बोराटे सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी सर्व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
स्वच्छता विभागाची बैठक 4 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आली होती. या अनुषंगाने एक महिन्याच्या कालावधीमध्ये जिल्ह्यामध्ये स्वच्छता सातत्य राखण्यासाठी गाव स्तरावर 1148 पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांच्या माध्यमातून 468 प्लास्टिक विक्रेते दुकानदार व उघड्यावरती कचरा फेकणारी व्यक्तींच्यावर कारवाई करून 62,502 इतका दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच 7586 विक्रेते व लोकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. गाव स्तरावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत 1332 गावांमध्ये प्लास्टिक संकलन केंद्र उभारण्यात आले आहेत. तसेच उघड्यावर कचरा टाकणार्‍या व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी 298 ग्रामपंचायत यांनी महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. जिल्ह्याचे स्वच्छतेचे सातत्य राखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी गावांमध्ये उघड्यावरती कचरा फेकणार्‍या लोकांची नावे पोलीस स्टेशनला कळवून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत व त्या व्यक्तींकडून दंड वसूल करण्यात यावा. पुढील एक महिन्यात ही मोहीम अधिक कडक करण्यात यावी. तसेच तालुका व जिल्हा स्तरावरील भरारी पथकांनी अचानक भेटी देऊन जिल्ह्यातील मोठ्या पंचायती, बाजाराची गावे, पर्यटन स्थळे यामध्ये कडक कारवाई कराव्यात प्रत्येक गावातील रस्ते, चौक, गाव परिसर कचरामुक्त करण्यासाठी मोहीम स्वरूपात उपक्रम हाती घेण्यात यावा. या कामासाठी जिल्ह्यातील पोलिसांनी सहकार्य करावे. सातारा जिल्ह्यातून कचरा ही समस्या कायमस्वरूपी घालवण्यासाठी गावपातळीवर जनजागृतीची उपक्रम करून लोकांची मानसिकता बदलण्याचे काम पथकांनी करावे, अशा सूचना पालकमंत्री यांनी दिल्या.

COMMENTS