Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोंढव्यातील गुंड मंगेश माने टोळीवर मोक्का कारवाई

पुणे/प्रतिनिधी ः पुणे शहरातील कोंढवा-सुखसागनर भागात दहशत माजविणारा गुंड मंगेश माने याच्यासह चार साथीदारांच्या विरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार या

एकनाथ शिंदेच्या अडचणी वाढल्या
आ. थोरात यांच्याकडून वाचनालयास पुस्तके भेट
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे  याची बदली

पुणे/प्रतिनिधी ः पुणे शहरातील कोंढवा-सुखसागनर भागात दहशत माजविणारा गुंड मंगेश माने याच्यासह चार साथीदारांच्या विरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे.
मंगेश अनिल माने (वय 26, रा. सरगम चाळ, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी), सागर कृष्णा जाधव (वय 30, रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे),पवन रवींद्र राठोड (वय 23, रा. साईनगर, कोंढवा बुद्रुक), अभिजीत उर्फ जब्या सुरेश दुधनीकर (वय 21, रा. गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता), सूरज पाटील अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. पोलिस आयुक्तांच्या आदेशाने आतापर्यंत शहरातील 29 गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे. मंगेश माने आणि साथीदारांनी कोंढवा, सुखसागरनगर, अप्पर इंदिरानगर, कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. मानेविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी असे गुन्हे दाखल आहेत. मंगेश माने यानी साथीदारांसह यापूर्वी देखील गंभीर गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ते वारंवार आर्थिक फायद्यासाठी जबरी चोरी, घातक हत्यारेचा वापर करून गंभीर दुखापत करून जबरी चोरी, खून, खूनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत यासारखे गुन्हे संघटितपणे करीत असल्याचे पूर्व रेकॉर्ड वरून दिसून आले आहे. त्यामुळे माने आणि साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय मोगले, संदीप भोसले, सहायक निरीक्षक विश्‍वास भाबड यांनी तयार केला होता. या प्रस्तावास अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी मंजुरी दिली. सहायक पोलिस आयुक्त शाहूराजे साळवे पुढील तपास करत आहेत.

COMMENTS