बैलगाडा शर्यतप्रकरणी 17 जण ताब्यात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बैलगाडा शर्यतप्रकरणी 17 जण ताब्यात

मायणी : धोंडेवाडी-अनफळे गावांच्या दरम्यान रायगुडे मळा नावाच्या शिवारात झालेल्या विनापरवाना व बेकायदेशीर झालेल्या बैलगाडा शर्यतीप्रकरणी 17 जणांना ताब्

नुकसानग्रस्त ऊसतोड मजुरांच्या मदतीला कृष्णा कारखाना धावला..!
ढवळपुरीत ‘रेकॉर्ड ब्रेक’ लसीकरण, एकाच दिवसात तब्बल अकराशे नागरिकांनी घेतली लस.
राज्याच्या मंत्रिपदी नियुक्तीनंतर पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचं औक्षण केलं.

मायणी : धोंडेवाडी-अनफळे गावांच्या दरम्यान रायगुडे मळा नावाच्या शिवारात झालेल्या विनापरवाना व बेकायदेशीर झालेल्या बैलगाडा शर्यतीप्रकरणी 17 जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दहिवडी पोलीस उपअधीक्षक यांच्या कार्यालयाकडून प्रसिध्दीपत्रक जारी करण्यात आले आहे.
मायणी पोलीस दूरक्षेत्राच्या कार्यकक्षेत विनापरवाना व बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. लाखो रुपयांची उलाढाल झालेल्या या बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीबाबत पोलिस अनभिज्ञ होते. त्यामुळे सर्वकाही सामसूम झाल्यावर तेथे पोलीस दाखल झाले. त्यांनी केलेल्या कारवाईबाबत सर्वत्र उलटसुलट चर्चा होऊ लागल्याने रात्री उशिरा त्यांनी प्रसिध्दीपत्रक जारी केले.ि

पोलिस उपअधीक्षक डॉ. नीलेश देशमुख, पोलिस उपनिरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी शर्यती संबंधित 17 व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्राणी संरक्षण अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन आणि महाराष्ट्र कोविड अधिसूचनेनुसार वडूज पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये किसन संभाजी शिंदे, गोपाळ मनोहर पाटोळे, अमित ऊर्फ बारक्या बाबूराव शिंदे, नवनाथ आप्पा आडके, सोमनाथ संभाजी मदने, प्रवीण ऊर्फ सीताराम बबन पाटोळे, समाधान दशरथ ठोंबरे, सागर पोपट भोसले, धीरज सोपान जाधव, रोहित सर्जेराव मंडले, सागर जगन्नाथ वायदंडे, मारुती अशोक पाटोळे, सुजित फुलपावर कांबळे, विशाल महादेव आडके, नीलेश मल्हारी पाटोळे, उमाजी मारुती आडके व आबासाहेब शिवाजी जाधव यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर अटकेची कारवाई सुरू आहे. दरम्यान, गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या व्हिडिओ क्लिपवरून गुन्ह्यातील इतर संशयित निष्पन्न करण्याचे काम सुरू असल्याचे प्रसिध्दिपत्रकात नमूद केले आहे.

COMMENTS