आरपीआयचे पवन भिंगारदिवे यांचे भिंगार कॅम्प पोलीसस्टेशन समोर उपोषण सुरू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरपीआयचे पवन भिंगारदिवे यांचे भिंगार कॅम्प पोलीसस्टेशन समोर उपोषण सुरू

अहमदनगर (प्रतिनिधी)-  भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत घासगल्ली येथे 14 वर्षाच्या मुलाने एका दारूच्या अड्ड्यावर दारू पिलयामुळें त्याला विषबाधा झाल

युवकांनी ए.पी. जे. अब्दुल कलाम यांना आदर्श मानून कार्य करावे – डॉ. आर. जे. बार्नबस
अहमदनगर जिल्ह्यात तरूणाची निर्घृण हत्या  
बायकोने घेतला नवऱ्याचा मोबाईल… रागाच्या भरात नवऱ्याने चिरला बायकोचा गळा

अहमदनगर (प्रतिनिधी)- 

भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत घासगल्ली येथे 14 वर्षाच्या मुलाने एका दारूच्या अड्ड्यावर दारू पिलयामुळें त्याला विषबाधा झाली व त्याची प्रकृती चिंताजनक झाली असल्याने त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते व त्या दिवशी संध्याकाळी भिंगार कॅम्प पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई करत दारूच्या अड्ड्यावर छापा टाकला 

त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारूचा साठा जप्त करण्यात आला परंतु त्या वेळेला जी कारवाई झाली ती योग्य नसून त्या कारवाईमध्ये पोलीस प्रशासन हे आरोपींना पाठीशी घालत असल्याने त्यामध्ये वाढीव कलम 328 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने युवक जिल्हा अध्यक्ष पवन भिंगारदिवे यांनी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण चालू करण्यात आले आहेत तरी कारवाई होईपर्यंत व कलम 328 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरु करण्यात आले आहे.

COMMENTS