Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोकमठाणमध्ये ज्ञानेश्‍वरी पारायण, कीर्तन महोत्सव

ब्रम्हलीन स्वामी लखनगिरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजन

कोपरगाव तालुका ः दक्षिणकाशी गोदावरी नदीकाठावरील तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण येथील कांचनवाडी व विभांडक ऋषी आश्रमात महान तपस्वी ब्रम्हलीन स्वामी लख

जामखेड तालूक्यात पाळला कडकडीत बंद
पारनेरला वराळ पतसंस्थेच्या ठेवीदारांचे उपोषण
लोकशाही रक्षणाची जबाबदारी सांगणारे साहित्य संमेलन ः रतनलाल सोनाग्रा

कोपरगाव तालुका ः दक्षिणकाशी गोदावरी नदीकाठावरील तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण येथील कांचनवाडी व विभांडक ऋषी आश्रमात महान तपस्वी ब्रम्हलीन स्वामी लखनगिरी महाराज यांचा अठरावा पुण्यतिथी सोहळा 20 ते 26 एप्रिल दरम्यान ज्ञानेश्‍वरी पारायण, अखंड हरिनाम सप्ताह, कीर्तन महोत्सव व विविध धार्मीक कार्यक्रमाने संपन्न होत असून या पुण्यतिथीची सांगता 27 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता ह.भ.प. श्रीकृष्णकृपांकित डॉ विकासानंद महाराज मिसाळ यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे.

            या पुण्यतिथी सोहळ्यानिमीत्त 20 एप्रिल रोजी सकाळी 8.35 वाजता ज्ञानेश्‍वरी पारायण प्रारंभानिमीत्त राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख मठाधिपती प. पू. रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते दीप व कलशपुजन, हभप राघवेश्‍वरानंद महाराज यांच्या हस्ते ग्रंथपूजन होईल. सकाळी 11ते 1 याकाळात हभप सर्जेराव महाराज टेके (20 एप्रिल) हभप विजय महाराज गुंजाळ (21 एप्रिल), भागवताचार्य हभप शामसुंदर महाराज नानेकर (22एप्रिल), हभप मुकेश महाराज होळंबे (23 एप्रिल), हभप राहुल महाराज डुमरे (24 एप्रिल), हभप अमोल महाराज गाडे (25 एप्रिल), श्री श्री 1008 महामंडलेश्‍वर काशिकानंद महाराज (26 एप्रिल), यांचा किर्तन महोत्सव साजरा होत आहे. 27 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता स्वामी लखनगिरी महाराजांच्या मुर्तीस ब्रम्हवृदांच्या मंत्रघोषात महामस्तकाभिषेक, महापुजा संपन्न होईल. या पुण्यतिथी सप्ताह काळात अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत स्वामी शंकरानंद सरस्वती महाराज, श्री श्री 1008 गणेशानंद सरस्वती महाराज, श्रध्दानंद महाराज महांकाळ वडगांव, गोदावरी धामचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज, श्री श्री 1008 महामंडलेश्‍वर काशिकानंद सरस्वती महाराज, गोपालनंद महाराज, आदि संत महंत ब्रम्हलिन स्वामी लखनगिरी महाराज समाधी मंदिर स्थानावर उपस्थित राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त भाविकांनी या कार्यक्रमासाठी तनमनधनाने सहकार्य करून किर्तन व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन कोकमठाण पंचकोशीतील लखनगिरी महाराज भक्त मंडळाचे सर्व सहकारी भाविकांनी केले आहे. पंचक्रोशीतील संवत्सर, कोकमठाण, सडे, पढेगांव, कासली, कोपरगांव बेट, जेउरकुंभारी, जेउरपाटोदा, माळवाडी, कारवाडी, शिंगवे, कुंभारी, भोजडे आदि गावातील भजनी मंडळींनी किर्तन महोत्सव यशस्वीतेसाठी उपस्थित राहुन सहकार्य करावे. विभांडक ऋषी मंदिर जीर्णोध्दार कार्यासाठी सढळ हाताने मदत करावी असेही आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS