Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पसरणी घाटात अज्ञातांकडून वणवा; आगीच्या ज्वाळांमुळे काही काळ वाहतूक ठप्प

पाचगणी: दांडेघर-पसरणी मार्गावर वणव्यामुळे सुरु असलेले अग्नी तांडव व धुरूच धूर.पाचगणी: दांडेघर-पसरणी मार्गावर वणव्यामुळे सुरु असलेले अग्नी तांडव व धुर

कायद्याच्या अंतिम वर्षाच्या अखेरच्या सत्रातील एक पेपर रद्द; शिवाजी विद्यापीठाचा निर्णय ; विद्यार्थ्यांना दुसर्‍यांदा द्यावी लागणार परिक्षा
हनुमान चालीसासह भोंग्यांची भाषेमुळे समाजात तेढ निर्माण : ना. जयंत पाटील
साकुर्डीत वीज कोसळल्याने ट्रान्सफर्मरसह पिंपळाचे झाड जळाले

वणव्यामुळे वनसंपदेबरोबर असंख्य वन्य जीव आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. असंख्य दुर्मिळ वनस्पती जळून बेचिराख होत आहेत. याकरिता पांचगणी-महाबळेश्‍वर या विभागातील वन समित्यांमार्फत यावर अंकुश ठेवून वणवा लावणार्‍या विघ्नसंतोषी लोकांना कडक शासन केले पाहिजे. तरच अशा घटनांना पायबंद बसेल.
पाचगणी / वार्ताहर : शनिवार, दि. 16 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दांडेघर बस स्टॉप जवळ पसरणी घाटात कोणी अज्ञाताने लावलेल्या वणव्यामुळे लागलेल्या आगीमुळे परिसरात खळबळ उडाली होती. आगीच्या ज्वाळांनी प्रकोप केल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला अग्निज्वाळा भडकल्याने सर्वत्र धूराचे साम्राज्य पसरले होते. सुरक्षितेतच्या कारणास्तव काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
चार दिवस सलगच्या सुट्या असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने पाचगणी-महाबळेश्‍वर येथे आले होते. त्यातच आज दुपारी दांडेघर-पांचगणी येथील बस स्टॉप जवळ अज्ञाताने लावलेल्या वणव्याने जंगलातील पाला-पाचोळ्याने पेट घतल्याने रस्त्यालगतच्या आगीच्या ज्वाळा भडकल्या होत्या. सर्वत्र मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने रस्त्याने येणारी वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. या प्रकारामुळे पसरणी घाटात वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. पसरणी घाट नेहमीच वनव्याच्या झळांच्या भक्षस्थानी पडत आहे. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी अशा वणवा लावणार्‍या विघ्नसंतोषी लोकांना अधिक कडक शासन करणे गरजेचे आहे. तरच अशा घटनांपासून वनसंपदेचे संरक्षण होवू शकेल.

COMMENTS