Homeताज्या बातम्या

बोगस लग्न लावून देणाऱ्या टोळीकडून नवरदेवाला 4 लाखाला गंडा

https://youtu.be/8YZbWDYhWRY बोगसपणे लग्न लावून देणाऱ्या संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील टोळीने आता अहिल्यानगर मध्ये शिरकाव करून चक्क नवरदेवाला 4

कथित धर्मांतर प्रकरणावर मंत्री शिरसाट आक्रमक; राज्यभर तपासाची मागणी, विरोधकांवरही टीका
कौडगाव जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरा झाला ‘शाळा प्रवेशोत्सव’; नवबौद्ध व इतर नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत
चिंचोलीच्या तलावात तरुणाचा बुडून मृत्यू

बोगसपणे लग्न लावून देणाऱ्या संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील टोळीने आता अहिल्यानगर मध्ये शिरकाव करून चक्क नवरदेवाला 4 लाखाला या टोळीने गंडा घातला ,नवरी मुलगी दोन दिवस नवऱ्याबरोबर राहिली आणि नंतर नवरीने आपल्या गावाकडे धूम ठोकली नवरदेवाकडील लोक या प्रकारामुळे गोंधळले आणि चक्क शेवगाव पोलिसात धाव घेऊन आपली तक्रार दाखल केली ,
शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथील ज्ञानेश्वर महादेव कडूळे हे नेवासा परिसरात कामानिमित्ताने गेले असता तेथे जातेगाव तालुका वैजापूर येथील ज्ञानदेव मिरगे यांच्याशी ओळख झाली व त्यांनी लग्नासंदर्भात आपल्याकडे मुली आहेत , आपण खूप काही लग्न लावून दिले आहेत , मुलगी चांगली आहे , तिला आई वडील नाहीत तिचा सांभाळ मावशीने केला आहे , अशा पद्धतीचे पटवून दिल्यावर मुलीची मावशी ज्योती राजू गायकवाड व मानलेली आजी सुमनबाई साबळे व ज्ञानदेव मिरगे यांनी मध्यस्थी करून लग्न लावून देण्यासाठी नवरदेवाला पैशाची मागणी करून चार लाख रुपये रोख स्वरूपात दिले असल्याचे नवरदेवाचे म्हणणे आहे , जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील नळणी बुद्रुक येथील कविता दामू बर्डे या मुलीशी शेवगाव तालुक्याच्या आंतरवाली येथे लग्न लावून दिले परंतु दोन दिवसात मुलीने कोणालाही न विचारता माहेरी आपल्या मावशीकडे निघून गेली , या लोकांनी आपले बोगस लग्न लावून देऊन आपली आर्थिक फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर शेवगाव पोलिसात नवरदेव ज्ञानेश्वर महादेव कडूळे यांनी याबाबत तक्रार दाखल केली असुन सर्व व्यक्तींनी खोटा विवाह जमवून माझी आर्थिक फसवणूक केली असल्याने याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे .

COMMENTS