Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला खिंडार

छ. संभाजीनगर : विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतांनाच राज्यात त्याचे पडसाद उमटतांना दिसून येत आहे. पक्षांतर करणार्‍यांची संख्या वाढत असून, रविवारी

राज्यात 15 ऑक्टोबरपासून ऊसाचा गाळप हंगाम
आदर्श शाळा बांधकामासाठी 494 कोटींना मंजुरी l DAINIK LOKMNTHAN
अहमदनगर – औरंगाबाद रेल्वे मार्गाला चालना देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश; देवगड, नेवासा व शनिशिंगणापूरला होणार अधिक लाभ

छ. संभाजीनगर : विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतांनाच राज्यात त्याचे पडसाद उमटतांना दिसून येत आहे. पक्षांतर करणार्‍यांची संख्या वाढत असून, रविवारी भाजपच्या अनेक नगरसेवकांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, जुमलेबाज सरकार घोषणा करत सुटले आहे. मात्र संभाजीनगरमध्ये आज मला जी ताकद मिळाली आहे, त्यामुळे संभाजीनगरचा गड आम्ही जिंकणारच असा निर्धार यावेळी ठाकरे यांनी व्यक्त केला.
रविवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह 6 माजी नगरसेवकांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे संभाजीनगरचा भाजपचा गड ढासळतांना दिसून येत आहे. त्यामुळे आमदार अतुल सावे यांच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे.

COMMENTS