Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खरातने पाच नरबळी दिल्याचा संशय; न्यायालयाने सुनावली पाच दिवसांची पोलिस कोठडी

अहिल्यानगर : महिलांवरील अत्याचार आणि फसवणुकीच्या गंभीर आरोपांमध्ये अडकलेल्या स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याला मंगळवारी नाशिक सत्र न्याया

मनपाचे १७१० कोटींचे अंदाजपत्रक सादर; सीना नदी कामांसाठी २० कोटी; ४० ई-बस ; शहरात ५०४ घरकुलांचे अपार्टमेंट
रमजाननिमित्त खजूर वाटप; सर्वधर्म समभावाचा संदेश
समाजसेवक देडगांवकरांचा ४६ वर्षांच्या समाजसेवेबद्दल सन्मान  

अहिल्यानगर : महिलांवरील अत्याचार आणि फसवणुकीच्या गंभीर आरोपांमध्ये अडकलेल्या स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याला मंगळवारी नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने पुढील तपासासाठी त्याला 29 मार्चपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने खरातच्या पिस्तुलच्या 5 काडतुसांचा वापर झाला असून त्याचा वापर त्याने नरबळीसाठी दिल्याचा संशय असून त्यादृष्टीने तपास करायचा असल्याचे सांगितले.
सुनावणी सुरू होण्यापूर्वीच न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. दुपारी सुमारे साडेतीनच्या सुमारास आरोपीला चेहरा झाकून न्यायालयात आणण्यात आले. दरम्यान, काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही न्यायालयात उपस्थिती लावून संताप व्यक्त केला. सरकारी वकिलांनी न्यायालयात मांडलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलांना फसवण्यासाठी विशिष्ट पद्धत वापरत होता. त्यांना प्रसाद म्हणून पेढे देणे, पाणी पाजणे आणि त्यानंतर अस्वस्थता निर्माण होईल असे काहीतरी देण्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या पदार्थांचा स्रोत शोधणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. तपासादरम्यान आरोपीच्या फार्महाऊसमधून शस्त्रासंबंधी काही पुरावेही सापडल्याची माहिती देण्यात आली. पिस्तुलातील काही काडतुसे वापरलेली आढळून आली असून ती नेमकी कुठे वापरली गेली याचा शोध घेतला जात आहे. काही बाबींमुळे गंभीर गुन्ह्यांचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच आरोपी स्वतःला सिद्ध पुरुष म्हणून सादर करत महिलांची फसवणूक करत असल्याचा आरोप आहे. त्याने अनेक महिलांना अशा प्रकारे जाळ्यात ओढले असण्याची शक्यता तपासली जात आहे. तपासात आरोपीकडून मोठ्या प्रमाणात रोकड, संगणकीय उपकरणे आणि शस्त्र जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्याच्याकडे आढळलेल्या काही वस्तू आणि प्राण्यांशी संबंधित बाबींचाही तपास सुरू आहे. वन्यजीव संरक्षणाशी संबंधित कायद्यांखालीही गुन्हा नोंद होण्याची शक्यता अधिकार्‍यांनी व्यक्त केली. सुनावणीदरम्यान आरोपी शांत उभा होता. न्यायाधीशांनी विचारणा केल्यावर काही आरोपांबाबत अनभिज्ञ असल्याचे त्याने सांगितले. मात्र न्यायालयाने तपासासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे मान्य करत पोलीस कोठडी वाढवली.


सहा गुन्ह्यांची नोंद; अनेक तक्रारी
या प्रकरणात आतापर्यंत सहा फौजदारी गुन्हे दाखल झाले असून अनेक महिलांनी तक्रारी केल्या आहेत. पीडित महिलांच्या म्हणण्यानुसार, आरोपी त्यांना वेगवेगळ्या कारणांनी वेगळे करून शोषण करत होता. तपास यंत्रणा या सर्व तक्रारींची सखोल चौकशी करत आहे.


मालमत्तेबाबतही चौकशी
आरोपीकडे विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. या मालमत्तेचा स्रोत आणि आर्थिक व्यवहारांचीही चौकशी केली जात आहे. नाशिकमध्ये एका महिलेच्या तक्रारीवरून या प्रकरणाची सुरुवात झाली. गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर तपासात विविध बाबी समोर येत असून प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होत चालले आहे.

COMMENTS