Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जाकिर नाईकला बांगलादेशात प्रवेश बंदी

ढाका : बांग्लादेशमधील मोहम्मद युनूस सरकारने भारतात वॉन्टेड असलेल्या कट्टर प्रवचक जाकिर नाईक यांच्या प्रस्तावित बांग्लादेश दौर्‍यावर आता बंदी घातल

महालक्ष्मी विद्यालयातील ग्रंथालयासाठी काळखैर कुटुंबाकडून मदत
जोरदार पावसाने बळीराजा सुखावला
एनसीएलचे संचालक डॉ. आशिष लेले; ‘जिज्ञासा’ पुस्तकाचे प्रकाशन

ढाका : बांग्लादेशमधील मोहम्मद युनूस सरकारने भारतात वॉन्टेड असलेल्या कट्टर प्रवचक जाकिर नाईक यांच्या प्रस्तावित बांग्लादेश दौर्‍यावर आता बंदी घातली आहे. तीव्र टीका आणि वाद निर्माण झाल्यानंतर सरकारने स्पष्ट केले आहे की सध्या नाईक यांना देशात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही. हा निर्णय ढाका सचिवालयात झालेल्या गृह मंत्रालयाच्या कायदा व सुव्यवस्था कोर समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
याआधी युनूस सरकारने द्वेषपूर्ण भाषणांसाठी कुख्यात असलेल्या जाकिर नाईक यांच्या स्वागताची तयारी सुरू केली होती. ही बातमी समोर आल्यानंतर भारताने अधिकृतरीत्या आक्षेप नोंदवला. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी करून सांगितले होते की, जर जाकिर नाईक ढाकाला पोहोचले, तर त्यांना भारताच्या ताब्यात दिले जावे अशी अपेक्षा आहे. बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारने 2016 मध्येच जाकिर नाईक यांच्या देशप्रवेशावर बंदी घातली होती.

COMMENTS