Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

हिंगोली ः मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पाचव्यांदा आमरण उपोषण सुरू केले आहे. तर दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे

डिप्रेशनमुळे तरुणीची आत्महत्या
गर्लफ्रेंडने 1 लाख मागितल्याने प्रियकराची आत्महत्या
संभाजीनगरमध्ये अल्पवयीन मुलीची आत्महत्या

हिंगोली ः मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पाचव्यांदा आमरण उपोषण सुरू केले आहे. तर दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे एका तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे.
 मुंजाजी गणेशराव शिंदे (27) असे मृत तरुणाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आतापर्यंत 22 जणांनी जीवन संपविले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांगरा शिंदे येथील मुंजाजी शिंदे हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सक्रिय होते. हिंगोली जिल्हयात ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता. या शिवाय अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला त्यांनी भेट दिली होती. हिंगोलीत झालेल्या सभेमध्ये त्यांनी स्वयंसेवक म्हणून कामही केले आहे. शासनाकडून मराठा समाजाला आरक्षण दिले जात नाही यामुळे मागील काही दिवासंपासून ते अस्वस्थ होते.

COMMENTS