डांबरप्रकल्प बंद करा, नुकसानभरपाई द्या, अन्यथा कुटुंबियासमवेत आत्मदहन !

Homeमहाराष्ट्रसातारा

डांबरप्रकल्प बंद करा, नुकसानभरपाई द्या, अन्यथा कुटुंबियासमवेत आत्मदहन !

बियांचे तहसीलदार यांना निवेदन

अनोखा विवाह सोहळा; ‘सेवालया’ मधील एचआयव्ही संक्रमित पाच जोडप्यांचे शुभमंगल सावधान!
अण्णासाहेब डांगे फार्मसीचे राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत दैदिप्यमान यश
शेतकऱ्यांनी 14 जानेवारीपर्यंत पाणी मागणी अर्ज सादर करावेत

गोपूज येथील शेतकरी कुटुंबियांचे तहसीलदार यांना निवेदन

काळे पाणी, काळी मेथी, उसावर केमिकलचा थर!

औंध / वार्ताहर : खटाव तालुक्यातील औंध रोडला गोपूज येथे राजपथ इन्फ्रा या कंपनीचा डांबर प्रकल्प चालू असून त्यातून निघणारे केमिकल, धूर यामुळे जवळ असणार्‍या शेतकरी कुटुंबाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने चालू ऊस व मेथी, कांदा पिकावर केमिकलचा थर साचल्याने त्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा,झालेल्या पिकांची नुकसानभरपाई मिळावी. अन्यथा तहसीलदार कार्यालयासमोर सोमवार, दि. 5 जुलै रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशार गोपूज येथील विकास दत्तात्रय घाडगे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझी जमीन गोपूज येथील गट नं 813 मध्ये आहे. यामध्ये मेथी, ऊस कांदा अशी पिके केली आहेत. माझ्या घराच्या पश्‍चिमेस राजपथ इन्फ्रा या कंपनीचे रस्त्याचे काम चालू असून डांबर प्लांट सुरू आहे. त्यातून बाहेर निघणार्‍या केमिकलमुळे शेतीवर काळा थर साचला आहे. विहिरीतील पाणी रसायनयुक्त झाले आहे. हातातोंडाला आलेली मेथी आता विक्रीयोग्य राहिली नाही. माझी आजी उषाताई पंढरीनाथ माने हिला डांबराच्या धुळीमुळे दम्याचा त्रास सुरू झाला आहे. भारतीय संविधानाच्या कलम 21 प्रमाणे आमच्या जगण्याच्या अधिकारावर गदा आली आहे.

संबंधित अधिकारी यांना प्रकल्प हलविण्याबाबत व नुकसानभरपाईची विनंती केली असता ते धमकीची भाषा करीत आहेत. त्यामुळे प्रकल्प सुरक्षित ठिकाणी हलवून नुकसानभरपाई मिळावी तसेच त्यांचेवर कडक कारवाई व्हावी अन्यथा कुटुंबियांसह सोमवार, दि. 5 जुलै रोजी आत्मदहन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले आहे.

COMMENTS