Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आपला दवाखान्याची वेळ गैरसोयीची

लातूर प्रतिनिधी - वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना प्रत्येक तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी 1 मेपासून सुरु झालेला आहे. त्या सोबतीला आरोग

दीनदुबळ्या रोगग्रस्तांची सेवा हाच माझा पुरस्कार-दत्ता बारगे
‘वंचित’चा ‘मविआ’सोबत अधिकृत काडीमोड
कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न

लातूर प्रतिनिधी – वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना प्रत्येक तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी 1 मेपासून सुरु झालेला आहे. त्या सोबतीला आरोग्य वर्धिनी केंद्र रुग्णाच्या सेवेत कार्यान्वित आहे. आपला दवाखान्याची रुग्णसेवेची वेळ दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत असली तरी त्याला रुग्णांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे सकाळी 10 ते सायंकाळी 5 ही वेळ करावी, असा प्रस्ताव स्थानिक स्वराज्य संस्थांचा आहे.
लातूर शहरात महानगरपालिका शाळा क्रमांक 2 येथे आपला दवाखाना सुरु आहे. लातूर शहरामध्ये आरोग्य वर्धिनी केंद्रांची संख्या 11 आहे. या सर्व आरोग्य वर्धिनी केंद्रांमध्ये सकाळपासूनच ओपीडी असते. आपला दवाखान्याची वेळ रुग्णांसाठी सोयीस्कर नाही. दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत आपला दवाखान्याचे वेळ असली तरी या वेळेत रुग्ण उपचारासाठी येत नाहीत. रुग्ण कामाहून आल्यानंतर या दवाखान्यात उपचार मिळावेत या हेतूने कामगार असलेल्या भागात आपला दवाखाना कार्यान्वित केला होता. मात्र ही वेळ दवाखान्यात येण्याच्या दृष्टीने गैरसोयीची आ.े त्यामुळे बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांनी दुपारी 2 ते रात्री 10 ऐवजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंधनकारक करावी, असा प्रस्ताव दिला आहे.

COMMENTS