Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाकरे गटाचे योगेश भोईर यांना अटक

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक योगेश भोईर यांना अखेर अटक करण्यात आली आहे. क्राईम ब्रांच युनिट 11 ने त्यांना अटक केली.

माऊलीच्या मदतीने तिला मिळतंय आयुष्याचं दान…
केबल जळाल्याने. वीजपुरवठा खंडित. संबंधिताच्या दुर्लक्षाने शेतकर्‍यांची पिके करपली
अशोकराव मिसाळ हे कर्तव्य दक्ष ग्रामविकास अधिकारी -श्री.शिवराम राऊत

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक योगेश भोईर यांना अखेर अटक करण्यात आली आहे. क्राईम ब्रांच युनिट 11 ने त्यांना अटक केली. त्यांच्यावर एका कंपनीकडे खंडणी मागितल्याचा आरोप आहे. दरम्यान योगेश भोईर यांना अटक करण्यात आल्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले. शिवसैनिकांनी क्राईम ब्रांच युनिटबाहेर जोरदार घोषणाबाजी करत भोईर यांच्या अटकेचा विरोध केला.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी अटक करण्यात आल्यानंतर भोईर यांना साऊथ मुंबईतील क्राईम ब्रांच कार्यालयात हलवण्यात आले. शिवसैनिक आक्रमक ठाकरे गटाचे माजी नगरसेवक योगेश भोईर यांना मंगळवारी खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली. क्राईम ब्रांच युनिट 11 ने त्यांना अटक केली. योगेश भोईर यांच्या अटकेनंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले. शिवसैनिकांकडून क्राईम ब्रांच युनिटबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी अटक करण्यात आल्यानंतर भोईर यांना साऊथ मुंबईतील क्राईम ब्रांच कार्यालयात हलवण्यात आले. शिंदे सरकारवर गंभीर आरोप दरम्यान या प्रकरणात ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांनी शिंदे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ’योगेश भोईर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात आम्ही गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना भेटलो. शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून ठाकरे गटाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा देखील तसाच प्रयत्न आहे. एका प्रकरणात चौकशीसाठी बोलवतात आणि दुसरेच गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली जाते. हे सर्व सुरू आहे , कारण पुढे मुंबई महापालिका निवडणूक असल्याचे’ घोसाळकर यांनी म्हटले आहे.

COMMENTS