Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

येलूर ग्रामपंचायत बिनविरोध : महाडीक गटाला सरपंच पद

इस्लामपूर / प्रतिनिधी : वाळवा तालुक्यातील अतिशय संवेदनशील मानल्या जाणार्‍या येलूर ग्रामपंचायतची निवडणूक राहुल महाडीक यांच्या प्रयत्नातून 9-6 अस

महिला शिक्षकांना त्रास देणार्‍या गटशिक्षणाधिकार्‍यांवर कारवाई करावी : नंदकुमार गोडसे
सातारच्या मेडिकल कॉलेज प्रवेश प्रक्रियेस परवानगी; 100 विद्यार्थ्यांना मिळणार एमबीबीएसला प्रवेश
साखराळे युनिटमध्ये प्रतिदिन दीड लाख लिटर इथेनॉल निर्मिती करणार : आ. जयंत पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : वाळवा तालुक्यातील अतिशय संवेदनशील मानल्या जाणार्‍या येलूर ग्रामपंचायतची निवडणूक राहुल महाडीक यांच्या प्रयत्नातून 9-6 असा फॉर्म्युला नुसार बिनविरोध होत आहे. यामुळे या बिनविरोध निवडीमुळे पंचक्रोशीत या निर्णयाचे स्वागत होत आहे.
महाडिक कुटुंबाने येलूर गावच्या विकासासाठी कायमच भरीव योगदान दिलेले आहे. परंतू निवडणूकी दरम्यान होत असलेल्या तीव्र संघर्षामुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडते. याचा विचार करून ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय राहुल महाडीक यांनी घेतला. महाडिक कुटुंबाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असताना येलूर या गावाने तंटामुक्ती अभियानात राज्यस्तरावर मोहोर उमटवली. हीच विधायकता जपत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोधच्या दिशेने नेत असताना एक आदर्श निर्माण केला आहे. यामध्ये 9/6 असा फॉर्म्युला ठरला आहे. यामध्ये सत्ताधारी महाडीक गटाला 9 जागा, लोकनियुक्त सरपंचपद व विरोधी गटाला 6 जागा, उपसरपंचपद असा फॉर्म्युला ठरला आहे. लोकनियुक्त सरपंच पदासाठी महाडीक गटाचे राजन महाडीक व बजरंग ऊर्फ विनायक महाडीक दोनच अर्ज दाखल झाले आहेत.
येलूर येथे कार्यरत असणार्‍या सर्वच राजकीय गटांना सोबत घेऊन विकासाची वाटचाल करण्याची राहुल महाडिक यांची भूमिका आहे. बिनविरोध निवडणुकीच्या स्वागतार्ह निर्णयासह भविष्यात या गावाला राज्यस्तरावर आदर्शवत करण्याचा त्यांचा मानस आहे. ग्रामपंचायत निवडणुकीवेळी होत असणारे राजकीय मतभेद व आर्थिक खर्च टाळत लोकोपयोगी विकासकामावर भर देणार असल्याची माहिती राहुल महाडिक यांनी दिली.

COMMENTS